
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनची कमान आता सिंधिया कुटुंबातील तिसऱ्या पिढीकडे असणार आहे. महानआर्यमान सिंधिया हे एमपीसीएचे अध्यक्ष बनणार आहेत. एमपीसीए निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज (शनिवार) शेवटची तारीख शनिवार होती. असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी महानआर्यमान सिंधिया यांच्या व्यतिरिकित इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे आता मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनची कमान आता महानआर्यमान सिंधिया यांच्याकडे येणार आहे.
आआधी माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. मात्र आता महानआर्यमान हे एमपीसीएचे सर्वात तरुण अध्यक्ष असणार आहेत. असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक 2 सप्टेंबरला होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट होती. मात्र अध्यक्षपदासाठी केवळ महानआर्यमान सिंधिया यांचाच अर्ज आला आहे, त्यामुळे आता ते अध्यक्ष बनणार आहेत.
येत्या मंगळवारी एमपीसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 3 वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडली जाणार आहे. या बैठकीस सहभागी होण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया आणि महानआर्यमान सिंधिया 1 सप्टेंबर रोजी इंदूरला जाणार आहेत. या सभेनंतर महानआर्यमान याच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येणार आहेत.
महानआर्यमान सिंधिया हे सध्या एमपीसीएचे सदस्य आहे. ते अवघे 29 वर्षांचे आहेत. महानआर्यमान सिंधिया लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचेही समोर आले आहे. याचे कारण म्हणजे याआधी माधवराव सिंधिया आणि नंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. महानआर्यमान सध्या ग्वाल्हेर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एमपीसीएचे सदस्य आहेत. आता ते अध्यक्ष बनतील आणि नंतर सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीसाठी 31 ऑगस्ट रोजी निवडणूक अधिकाऱ्यांकडून नामांकन अर्जांची छाननी करतील आणि त्यानंतर उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील. 1 सप्टेंबर रोजी नावे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होईल. त्यात मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.