चितेवर होते गर्लफ्रेंडचे कलेवर, बॉयफ्रेंडने भांगेत भरला सिंदूर आणि आसवे गिळत केले वचन पूर्ण …

एका प्रियकराने प्रेयसीला दिलेले लग्नाचे वचन तिच्या मृत्यूनंतरही पूर्ण केले आहे. या तरुणाच्या प्रेयसीवर मंत्रोच्चारात एकीकडे अग्निसंस्कार सुरु करण्याची तयारी सुरु होती. तर दुसरी लग्नाचा विधी सुरु करण्यात आला होता. सर्वांच्या डोळ्यात आसवांचा पाऊसच पडत होता...

चितेवर होते गर्लफ्रेंडचे कलेवर, बॉयफ्रेंडने भांगेत भरला सिंदूर आणि आसवे गिळत केले वचन पूर्ण ...
| Updated on: Jun 16, 2025 | 4:41 PM

खरे प्रेम नशीबवाल्यांना मिळते. आजच्या फास्ट युगात खरे प्रेम मिळणे जवळपास अशक्य आहे. परंतू खरे प्रेमाच शेवट नेहमी गोडच होतो असे नाही. उत्तरप्रदेशातील महराजगंज येथे एक खऱ्या प्रेमाचा दाखला पाहायला मिळाला आहे. येथे एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यावेळी प्रियकराने तिच्या मृतदेहाशी लग्न लावत अनोख्या प्रेमाची दखल घ्यायला लावली आहे. या लग्नात पंडितजी दु:खी अंत:करणाने मंत्र म्हणत होते. तर नवरदेवाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारावाहात होते. त्यांची वधू चितेवर विसावली होती. प्रत्येकाचे डोळे हे दृश्य पाहून ओले झाले होते.

निचलौल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. येथील एक तरुणाचा दुकान आहे. तो भाड्याच्या घरात रहातो. परंतू त्याचे घरमालकाच्या मुलीशी प्रेम जुळले. प्रकरण घरच्यांना कळले तेव्हा दोन्ही घरातून विरोध झाला. परंतू दोघांच्या जिद्दीपुढे त्यांना झुकावे लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांनी आपला संसार सुरु करण्याची स्वप्नं पाहीली होती. परंतू या तरुणीने कोणत्या तरी कारणाने आत्महत्या केली.या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

प्रेयसीच्या मृत्यूच्या बातमी प्रियकरांची हालत खराब झाली तो तडक प्रेयसीच्या घरी पोहचला. त्याने येथे कुटुंबियांना सांगितले की मी तिला वचन दिले होते तिच्याशीच लग्न करणार, त्यामुळे आपण लग्न करायला तयार आहे असा हट्ट त्याने केला.आम्ही साथ राहू शकलो नाही तरी ती सौभ्याग्यवती असणार आहे. नंतर प्रेयशीच्या मृतदेहाशी लग्न लावण्याच त्याचा हट्ट मुलीच्या घरच्यांनी देखील मान्य केला. अंतिम संस्कार एकीकडे सुरु झाले तर दुसरीकडे पंडितजी लग्नाचे मंत्र म्हणू लागले. प्रेयसीला लाल रंगाचा जोडा परिधान करण्यात आला. त्यावेळी उपस्थित महिलांच्या अश्रूंचा बांध तुटला. एक वेगळात माहोळ तयार झाला. पंडितजी असा विवाह पहिल्यांदाच लावत होते. त्यांच्या तोंडातून मंत्र फुटेनात…

सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल

वैदीक मंत्रोच्चारात या अभाग्या प्रेमवीराचे लग्न त्याच्या मृतावस्थेत पडलेल्या प्रेयसीशी लागले. त्यानंतर तिची अर्थी सुहागनच्या रुपात उठली. प्रियकराने स्मशानात पोहचून प्रेयसीच्या कलेवराला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियाववर व्हायरल होत आहे.

पोलिसांची भूमिका काय ?

पोलिसांनी सांगितले की आम्हाला मुलीने आत्महत्या केल्याची सूचना मिळाली आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला होता. नंतर हा मृतदेह कुटुंबियाच्या हवाली करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.