5 मे रोजी लग्न, 25 ला हनीमूनला रवाना, 29 ला गायब…हनीमूनची अजून एक शोकांतिका
सिक्कीमला हनीमूनला गेलेल्या आणि बेपत्ता जोडप्याच्या कुटुंबीयांनी डीआयजी अक्षय सचदेवा आणि परिसरातील एसपींसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

शिलाँगला गेलेल्या हनीमून कपल्सची शोकांतिकेचे कवित्व अजूनही संपण्याचे नाव घेत नसताना आता आणखी एक हनीमून ट्रजेडी घडली आहे. युपीच्या प्रतापगढ येथील एक जोडपे नुकतेच लग्न होऊन सिक्कीमला हनीमुनला गेले होते. त्यांचे वाहन एका हजार फूट दरीत कोसळल्याचे म्हटले जात आहे. या जोडप्याच्या कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. तिस्ता नदीच्या पात्रात आणि दरीत या दाम्पत्याच्या शोधासाठी मोहिम सुरु आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रतापगढ निवासी बेपत्ता झालेले कौशलेंद्र प्रताप सिंग ( २९ ) हे भाजपा नेते उम्मेद सिंग यांचे भाचे आहेत. कौशलेंद्र याचा ५ मे रोजी धनगड सराय चिवलाहा गावातील विजय सिंह डब्बू याची कन्या अंकिता सिंह (२६) हिच्याशी विवाह झाला होता. कौशलेंद्र यांचे काका दिनेश सिंह याच्या मते हे नवदाम्पत्य २५ मे रोजी सिक्कीमसाठी रवाना झाले होते. २६ मे रोजी ते मंगन जिल्ह्यात पोहचले. २९ मे रोजी लाचेन येथून परताना जोरदार पाऊस झाला. त्यावेळी त्यांचे वाहन नदीत कोसळल्याचे म्हटले जात आहे.
या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांनी सरकार आणि प्रशासनाना मुलगा आणि सूनेला शोधून काढण्याची मागणी केली आहे. प्रतापगढ जिल्ह्याचे हे नवदाम्पत्य कारने भरपावसात येत असताना तिस्ता नदीत त्यांची कार कोसळली. दोघांचा शोध घेणे चालू असून या दरीत सर्च ऑपरेशन सुरु आहे. ही घटना २९ मे रोजी झाल्याचे म्हटले आहे. हे दाम्पत्यासह त्यांचा ड्रायव्हर आणि एकूण ९ लोकांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही.
नऊ जण गायब
२९ मे रोजी जोरदार पावसात त्यांचे वाहन बेपत्ता झाले आहे. या वाहनात या दोघांच्या शिवाय अन्य सात पर्यटक या वाहनात बसले होते. दोन उत्तर प्रदेशातील, दोन त्रिपूराचे आणि चार ओडिशाचे होते. स्थानिक चालकासह ते पर्यटनाला निघाले असताना हे सर्व जण बेपत्ता झाले आहे.
नदीत कोसळल्याचा एकही निर्णयाक पुरावा
दिनेश सिंह यांनी सांगितले की २९ मे रोजी लाचेनवरुन परतताना पावसाने कथितरित्या त्यांचे वाहन नदीत पडल्याचे म्हटेल आहे. त्याच्या पैकी एकाचेही शव किंवा अन्य कोणा जीवित व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलेले नाही. आम्ही त्यांचे सामान हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. परंतू ते नदीत कोसळले होते का याचा एकही निर्णयाक पुरावा मिळाले नाहीत. त्यांच्या शोधासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ आणि एनडीआरएफ टीमना कामाला लावलेले आहे , परंतू त्यांना यश मिळालेले नाही.
