AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पाकिस्तानातही ‘हनीमून कांड’…दीरामुळे नवपरिणीत जोडप्याने असे काही केले की..

भारतातील मध्य प्रदेशातील सोनम आणि राजा यांचे शिलाँग हनीमून ट्रॅजेडी प्रकरण देशभरात चर्चेत असताना आता आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानातही याची लागण झाली आहे.

आता पाकिस्तानातही ‘हनीमून कांड’…दीरामुळे नवपरिणीत जोडप्याने असे काही केले की..
| Updated on: Jun 10, 2025 | 6:25 PM
Share

मेघालयातील निसर्गाच्या सानिध्यात हनीमूनवर गेलेल्या नवपरिणीत जोडप्यापैकी पतीचा मृतदेह दरीत सापडतो आणि पत्नी गायब असते…नंतर पत्नीच व्हीलन ठरते असे हे मध्य प्रदेशचे राजा-‘सोनम बेवफा’ प्रकरण ताजे असतानाच पाकिस्तानत एक हनीमून कांड घडलंय. पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये एक नवविवाहीत जोडपे साजिद आणि रजिया हनीमूनवर जाऊ न शकल्याने त्यांनी आततायी पाऊल उचलल्याने ही पण एक हनीमून ट्रॅजेडी ठरली आहे.पण थोडी वेगळी…

पाकिस्तानच्या फैसलाबाद शहरात मंगळवारी एका नवविवाहीत जोडप्याने धावत्या ट्रेनखाली आडवे झोपून जीव दिला आहे. तीनच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या साजिद आणि रझिया यांनी भाईवाला रेल्वे क्रॉसिंगवर बदर एक्सप्रेस ट्रेन खाली येऊन स्वत:च्या प्रेमकहानीचा शेवट केला. घटनेनंतर रेस्क्यू टीम आली. आणि दोन्ही मृतदेहांना फैसलाबादच्या एलाईड हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मोठ्या भावामुळे घडलं सारं

साजिद फैसलाबाद येथील अदील टाऊनचा रहिवासी आहे. एका पॉवर लूम फॅक्टरीत तो काम करतो. पोलिस तपासात वेगळीच कहानी समोर आली. साजिद याने त्याच्या मोठा भाऊ जाहीदकडे काही पैशांची मागणी केली होती. त्याला त्याची पत्नी रझिया हीला घेऊन फिरायला जायचे होते. परंतू मोठ्या भावाने काही दिवस थांबायला सांगितले.त्यामुळे साजिदला प्रचंड दु:ख झाले. आणि त्यांनी हे आततायी पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

सर्वात आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे साजित घरातून त्याच्या पत्नीसह हनीमूनवर निघाला. आणि रेल्वे ट्रॅकवरुन त्याने भावाला शेवटचा कॉल केला. जाहीद याने त्याला थांबवण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्न करुन पाहीला. परंतू साजिदने त्याचे बोलणे संपवल्यानंतर पत्नी रजियासह रुळांवर झोपला.

प्रकरणाची चौकशी सुरु

पोलिस या सर्व प्रकरणाची चौकशी करीत आहेत. पोलिसांना आश्चर्य वाटत आहे की एवढ्या शुल्लक गोष्टीसाठी कोणी इतके टोकाचे पाऊल कसे काय उचलू शकतो.या घटनेमागे अन्य काही कारणे आहेत का? सामाजिक किंवा कौटुंबिक दबाव तर नव्हता ना.? रझियाकडूनही काही मानसिक तणाव किंवा घरगुती कलह असल्याचे काही उघडकीस आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या घटनेने पाकिस्तानात आत्महत्या आणि मानसिक ताण-तणावावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. खासकरुन नवविवाहितांच्या आशा आकांक्षा आणि जबाबदारीच्या ओझ्या खाली त्यांना असे आततायी पाऊल उचलावे लागत आहे का ? यावर चर्चा सुरु आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.