भगतसिंह कोश्यारी बॅक टू उत्तराखंड? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाव आघाडीवर

| Updated on: Mar 10, 2021 | 11:14 AM

2000 मध्ये उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून 21 वर्षांच्या काळात काँग्रेसच्या नारायण दत्त तिवारी यांच्याशिवाय एकाही मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही (Bhagatsingh Koshyari Uttrakhand Chief Minister Race)

भगतसिंह कोश्यारी बॅक टू उत्तराखंड? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाव आघाडीवर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us on

देहरादून : त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी उत्तराखंडच्या (Uttrakhand Political Crisis) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खुर्चीचा पुढचा दावेदार कोण, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari) यांचं नावही उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. कोश्यारींनी याआधीही उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari name in Uttrakhand Chief Minister Candidature Race)

मुख्यमंत्रिपदाचा दावेदावर निवडण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरु होती. आतापर्यंत कुठल्याही नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. उत्तराखंडचे प्रभारी आणि छत्तीसगढ़चे माजी मुख्यमंत्री रमणसिंह, भाजपचे प्रदेश प्रभारी दुष्यंत कुमार गौतम हे देहरादूनमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बुधवारी पुन्हा चर्चा होणार आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचा परिचय

भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या दीड वर्षांच्या काळात कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यामध्ये वारंवार संघर्षाची ठिणगी पडताना दिसत आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे. 80 वर्षीय भगतसिंह कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते.

वर्षभरासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री

उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-2002 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. तर 2014 मध्ये ते नैनिताल-उधमसिंग नगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

कोश्यारींशिवाय कोणाकोणाची नावं चर्चेत?

राज्यसभा खासदार अनिल बलुनी, नैनितालचे लोकसभा खासदार अजय भट्ट आणि कॅबिनेट मंत्री धनसिंह रावत यांची नावंही उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानली जातात. 2000 मध्ये उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून 21 वर्षांच्या काळात काँग्रेसच्या नारायण दत्त तिवारी यांच्याशिवाय एकाही मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.

उत्तराखंडमधील राजकीय वादळामुळे गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने हे वादळ थंडावले. रावत यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा स्वीकारला. राज्यपालांच्या आदेशानुसार, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्रिवेंद्रसिंह रावत हे कार्यकारी मुख्यमंत्री असतील आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहील. (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari name in Uttrakhand Chief Minister Candidature Race)

रावत यांचा राजीनामा का?

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याबद्दल रिष्ठ नेत्यांकडे पक्षाच्याच आमदारांनी तक्रार केली होती. रावत यांच्या कार्यशैलीमुळे आमदार असंतुष्ट होते. त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री राहिल्यास पुढची विधानसभा निवडणूक भाजप हरे, अशी भीती आमदारांना होती. मंत्रिमंडळ विस्तारात झालेली दिरंगाईही त्यांच्या राजीनाम्याचे कारण ठरली. उत्तराखंडचे निरीक्षक रमण सिंह यांनी रावत यांच्याविषयीचा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सादर केला आणि या अहवालाच्या आधारे रावत यांच्या नशिबाचा फैसला झाला.

संबंधित बातम्या :

हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस

(Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari name in Uttrakhand Chief Minister Candidature Race)