Maharashtra News LIVE : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज काँग्रेसचा दिल्लीत पुन्हा एल्गार
Maharashtra News LIVE : मुख्य निडवणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेससह इंडिया ब्लॉकने पुन्हा आंदोलन छेडले आहे. आज विरोधी पक्ष निवडणूक आयुक्तांविरोधात जन महाभियोग चालवणार आहेत. तर राज्यातील आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ पर्वाच्या निमित्ताने ध्वजाच पूजन
नाशिकमध्ये तब्बल बारा वर्षानंतर उद्या होणाऱ्या सिंहस्थ कुंभ पर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने ध्वजाच पूजन आज केलं जाणार आहे. नाशिकच्या पुरोहित संघाच्या ब्रह्म वृंदाकडून विधिवत पूजनानंतर हा ध्वज उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज स्तंभावर फडकवला जाणार आहे. कुंभमेळ्याचा मुख्य ध्वज श्री काळाराम मंदिरातून आज दुपारी १ वाजता तपोवन मैदानावर आणणार. दुपारी २ वाजता परिक्रमा सुरू होईल सायंकाळी ७ वाजता परिक्रमा रामकुंडावर पोहोचल्यावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
-
शिवसैनिक समृद्धी महामार्ग रोखण्यावर ठाम
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा ठाकरेंचा शिवसेनेकडून देण्यात आलाय.पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी शिवसैनिक मास्तर आंदोलनावर ठाम आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आलाय. मात्र कितीही बंदोबस्त लावला तरी समृद्धी महामार्ग आम्ही अडवणारच आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही छातीवर गोळ्या झेलायलाही तयार असून सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास पाचही जिल्ह्यातील राज्य महामार्ग बंद पाडू असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे वाशिम जिल्हा प्रमुख बालाजी वानखेडे यांनी टीव्ही नाईन शी बोलताना दिलाय.
-
-
अहिल्यानगर जिल्ह्यात 208 गावांत 220 पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू
अहिल्यानगर जिल्ह्यात 208 गावांत 220 पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. पाणी स्रोत आणि पाणीपुरवठा योजनांच्या 1 किलोमीटर परिसरातील पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे. अनधिकृत कनेक्शन घेऊन पाणी उपसा करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. महापालिका हद्दीत स्वीमिंग पूल, वॉशिंग सेंटर आणि बांधकामासाठीच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्याच्या सूचना पाण्याच्या पर्यायी स्रोतांचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुळासह विविध धरणांच्या योजनांमधून, MIDC आणि महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपातीच्या शासनाच्या सूचना आहेत.
-
भीमाशंकर अभयारण्यात शेकरूची जीवघेणी धावपळ कॅमेरात
महाराष्ट्राचा राज्यप्राणी आणि सह्याद्रीच्या जंगलाची शान असलेला दुर्मिळ शेकरू सध्या भीमाशंकर अभयारण्यात मानवी वर्दळीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहे. भीमाशंकरमधील वरदळीच्या ठिकाणी रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या उंबराच्या झाडावर शेकरू उंबरफळे खात असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरून होणारी मानवी वर्दळ आणि वाहनांची ये-जा यामुळे या शेकरूची घाईघाईने हालचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे कर्जत-भीमाशंकर परिसरात वृक्षतोड होत असल्याच्या घटना समोर येत असताना, या जंगलातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जंगलातील अधिवास धोक्यात आल्यामुळे शेकरूसारखे दुर्मिळ वन्यजीव असुरक्षित झाले आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. जंगलातील अधिवास धोक्यात आल्यामुळे वन्यजीव भयभीत झाले आहेत का? त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर होणाऱ्या परिणामांचा हा संकेत तर नाही ना? जंगलातील प्रत्येक झाड हे शेकरूसारख्या असंख्य वन्यजीवांचे घर आणि अन्नाचे स्रोत आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड आणि त्याचा वन्यजीवांवर होणारा परिणाम याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
-
नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन; थेट सुजलॉन टॉवरवर चढला
नंदूरबार महसूल विभागाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन केले तो थेट सुजलॉन टॉवरवर चढला. तलाठी-कोतवालांनी शेतजमीन सपाटीकरणासाठी २० हजार रुपये मागितल्याचा शेतकऱ्याचा गंभीर आरोप आहे. पाच हजार रुपये दिले, उर्वरित १५ हजार न दिल्याने कारवाई केल्याचा शेतकऱ्याचा दावा आहे. शेतकऱ्याला २ लाख, तर जेसीबी मालकाला साडेसात लाखांचा दंड ठोठावल्याने या कारवाईवरून संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर प्रशासनाला आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची समजूत काढण्यात यश आले. न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असा इशारा बाबूलाल पाटील यांनी दिला.
-
-
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचा मार्ग मोकळा, ओबीसी टक्का घसरणार
सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या आदेशानुसार निवडणुका झाल्यास नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसींच्या ५ जागा कमी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील रखडलेल्या २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम पुढील महिन्यात पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
-
मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या चाचण्यांना वेग, डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता
मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या चाचण्यांना वेग आला आहे. डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गावरील साईबाबा नगर ते शहीद भगतसिंग उद्यान या टप्प्यात महत्त्वाच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये मेट्रोचा वेग, ब्रेक, धावताना होणारे कंपन आणि मेट्रोचे संतुलन तपासण्यात येत आहे. मेट्रोचे सिग्नल, वीजपुरवठा, ओव्हरहेड वायर आणि सुरक्षित अंतर राखणारी यंत्रणाही तपासली जात आहे. सर्व चाचण्या आणि सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबरपर्यंत मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्या साठी मेट्रो मार्ग ९ चे पुढं चे पाऊल. भविष्यात या मेट्रो चा विस्तार वसई विरार पर्यंत होणार आहे
-
जाहिरात बाजी करत दुष्काळग्रस्तांना होणार दिवाळी किटचे वाटप-रविराज साबळे
जाहिरात बाजी करत दुष्काळग्रस्तांना होणार दिवाळी किटचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मोठे मोठे बॅनर लावून पुण्यातून मतदारसंघाकडे टेम्पो रवाना झाले आहेत. मतदार संघातून सावंतावर टिकेची झोड, दिवाळी किट जाहिरात करण्यासाठी देताय का? रविराज साबळे यांनी सवाल केला. आश्वासन दिलेलं पाणी तुम्ही मतदारसंघात आणला असतं तर आम्हाला तुमच्या पाच किलो साखर ची गरज लागली नसती असा टोलाही साबळे यांनी लगावला.
-
चंद्रपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र धुक्याची चादर
सकाळी लवकर घराबाहेर पडलेल्या अनेकांनी अनुभवलं धुक्याच्या चादरीचं मनमोहक दृश्य दिसेल. अर्णब चक्रीवादळमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात आणि आद्रतेत मोठा बदल झाल्यामुळे चंद्रपुरात ही धोक्याची चादर पसरल्याचं मानलं जात आहे.गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे वातावरणातील आद्रतेत मोठी वाढ झाली आहे.दिवसा असलेलं जास्त तापमान आणि पहाटेच्या वेळी या तापमानात झालेली मोठी घट यामुळे हे धुकं तयार होतं.
-
नाशिकमध्ये ‘नगरपरिक्रमा’चे विशेष आयोजन
नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ‘नगरपरिक्रमा’चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ तथा सिंहस्थ समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नगरपरिक्रमा करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता या परिक्रमेला तपोवनातून प्रारंभ होणार आहे. कुंभमेळ्याचा मुख्य ध्वज श्री काळाराम मंदिरातून आज दुपारी १ वाजता तपोवन मैदानावर आणणार. दुपारी २ वाजता परिक्रमा सुरू होईल सायंकाळी ७ वाजता परिक्रमा रामकुंडावर पोहोचल्यावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
-
मुंबई उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात
मुंबई उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून रस्ते ओले झाले आहेत.अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा उपनगरातील कांदिवली – मालाड परिसरात थेंब थेंब पावसाला सुरुवात झाली आहे.
-
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस पुन्हा मैदानात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरली आहे. आज दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. अभासी खटला आणि अभासी महाभियोग चालवला जाणार आहे. आज दुपारनंतर काँग्रेसची रॅली निघेल. तर संध्याकाळी अभासी महाभियोग खटला चालवला जाणार आहे. यावेळी इंडिया आघाडीतील सर्व खासदार हजर असतील. या रॅलीत सीजेपीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसह इंडिया आघाडीने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. आज दिल्लीत होणार्या रॅलीत सीजेपी पक्षाचे नेते अभिजीत दिपके आणि इतर नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया ब्लॉक जन महाभियोग चालवणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. आज लोकअदालत भरवली जाणार आहे. त्यात अभासी खटला चालवला जाईल. या सर्व घडामोडींचे लाईव्ह स्ट्रीमिंग, थेट प्रसारण करण्यात येणार आहे. तर उद्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वीच दिल्ली दणाणून सोडण्यात येणार आहे.
तर आज शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता त्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. दोन हजार रुपयांचा हप्ता त्यांना मिळेल. तर दुसरीकडे राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे. ही रक्कमही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेत न्यायालयाने या निवडणुका जुन्या अंतरिम व्यवस्थेनुसार तातडीने घेण्याचे आदेश दिले आहेत.
तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकत्र आले. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालानंतर एकाच कार्यक्रमात हे तिघे एकत्र आले. यावेळी त्यांनी राजकीय कोपरखळ्याही मारल्या. राजकीय चिमटेही काढले. याची राज्यभर चर्चा रंगली. दरम्यान विधान परिषदेच्या निकालावरून शिंदे सेना आणि भाजपमधील वाद समोर आले आहेत.