केंद्रीय निवडणूक आयोगात मोठा फेरबदल; CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनाला मोठे यश? ज्ञानेश कुमार…

Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या महिनाभरपासून विरोधक आक्रमक आहेत. कॉकरोच जनता पार्टीही मैदानात उतरलेली आहे. त्याचवेळी आयोगात मोठा खांदेपालट झाला आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

केंद्रीय निवडणूक आयोगात मोठा फेरबदल; CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनाला मोठे यश? ज्ञानेश कुमार...
केंद्रीय निवडणूक आयोगात मोठा फेरबदल; मोठी खांदेपालट
| Updated on: Nov 06, 2026 | 9:15 AM

Election Commission of India Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. एक महिन्यापासून सीजेपीसह काँग्रेस, इंडिया आघाडीने वेगवेगळी आंदोलनं केली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दोन इतर आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी हे सुद्धा नाराज असल्याचे समोर आले होते. त्याचवेळी आता आयोगात मोठा खांदेपालट झाल्याचे वृत्त धडकले आहे. काय झाला हा बदल? विरोधकांच्या आंदोलनाला खरंच आलं का मोठं यश?

निवडणूक आयोगात काय झाला मोठा बदल?

Loading...

केंद्रीय निवडणूक आयोगात प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा निर्णय झाला. आयोगाच्या अंतर्गत कार्यपद्धत आणि जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल झाला. आता आयटी(IT) आणि (ICT) विभागाची जबाबदारी ही वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त पवन कुमार शर्मा यांच्याकडे पुन्हा सोपवण्यात आली आहे. तर सध्याच्या सीमा खन्ना यांना दुसरा पदभार देण्यात आला आहे. ECINet वरून निवडणूक आयोगात आणि बाहेरी मोठी नाराजी सुरू होती. त्यात काही बदल करण्याचे अधिकारच काढून घेण्यात आल्याने वाद उद्भवला होता.

सीमा खन्ना यांच्यावर कोणती जबाबदारी?

नवीन आदेशानुसार, आयटी महानिदेशक डॉ. सीमा खन्ना यांना त्यांच्या विभागाशी संबंधित सर्व फाईल्स आणि प्रस्ताव वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त पवन कुमार यांच्या आदेशानेच करावे लागतील. काही महिन्यांपूर्वी कार्य आदेशावरून निवडणूक आयोगामध्ये अंतर्गत वाद झाला होता आणि त्याची तक्रार कॅबिनेट सचिवांपर्यंत गेली होती. त्यानंतर आता प्रशासनाने हा बदल केला आहे.

ECI-Net वरून मोठा बदल

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ईसीआय-नेट पोर्टल आणि कार्यपद्धतीवरून वादंग उठले होते. निवडणूक आयोगातही ठिणगी पडली होती. यासंबंधीची तक्रार कॅबिनेट सचिवांपर्यंत करण्यात आली होती.

मतदार डेटा-सॉफ्टवेअर केंद्रीकरण: आयोगाने मतदार याद्यांच्या व्यवस्थापनासाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी डिजिटल प्रणालीचा ECI-Net वापर केला. पण त्यात एकाधिकारशाही आणली जात असल्याचा आरोप झाला.

Form 6 मधील बदल आणि SIR घोषणापत्र: ECI-Net पोर्टलवरील फॉर्म 6 मधील नवीन मतदार नोंदणी अर्जात एक नवीन प्रश्न आणि अट जोडण्यात आली होती. त्यात जुन्या मतदार सखोल विशेष पुनरिक्षणची माहिती देणारी घोषणापत्र जोडण्याचे बंधनकारक करण्यात आले होते.

दोन आयुक्तांचा आक्षेप: या सर्व प्रक्रियेवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे लेखी आक्षेप घेतला होता. हा पत्रव्यवहारही आता समोर आलेला आहे. तर गोवा आणि महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांनीही ECI-Net मध्ये माहितीच अपडेट होत नसल्याचा आक्षेप नोंदवला होता. दरम्यान या सर्व वादानंतर आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR संबंधित प्रक्रियेच्या अटी आणि नियमाबाबत माघार घेतली आहे. तर आता प्रशासकीय फेरबदल केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us