AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rejinagar By Election : ममता बॅनर्जी यांना तिसरा सर्वात मोठा धक्का? मतदानाआधीच पोटनिवडणुकीत पराभव होणार? काय घडतंय?

रेजीनगर मतदारसंघाच्या अगोदर ममता बॅनर्जी यांनाा नंदीग्राम मतदारसंघात मोठा फटका बसला आहे. बॅनर्जी यांनी या जागेवरून संचिता प्रधान डे यांना उमेदवारी दिली होती. परंतु बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

Rejinagar By Election : ममता बॅनर्जी यांना तिसरा सर्वात मोठा धक्का? मतदानाआधीच पोटनिवडणुकीत पराभव होणार? काय घडतंय?
mamata banerjee and tmcImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 3:32 PM
Share

West Bengal ByElection : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तेथे रेजीनगर आणि नंदिग्राम या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान होईल. दरम्यान, ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबर धक्का बसला. तृणमूल काँग्रेसचे पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गोठवण्यात आले. सध्या बॅनर्जी यांच्या पक्षाला नवे नाव देण्यात आले असून निवडणूक चिन्हही बदलले आहे. हा धक्का ताजा असतानाच नंदीग्राम मतदारसंघातून बॅनर्जी यांच्या पक्षाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली. हा दुसरा धक्का बसेलला असताना आता रेजीनगर मतदारसंघातूनही बॅनर्जी यांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. त्यामुळे बॅनर्जी यांची ही जागादेखील धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

रेजीनगर मतदारसंघात नेमकं काय घडतंय?

पश्चिम बंगालच्या रेजीनगर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. शनिवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने रबीउल आलम चौधरी यांना तिकीट दिले आहे. त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पक्षाचे नाव बदलले आहे. निवडणूक चिन्हही बदलण्यात आलेय. त्यामुळे एवढ्या कमी वेळात मतदारांपर्यंत नवे चिन्ह घेऊन जाणे अशक्य आहे, असे मत चौधरी यांनी व्यक्त केलं होतं. तसंच निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिले होते. परंतु ममता बॅनर्जी यांची भेट झाल्यानंतर ते आता आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नंदीग्राम मतदारसंघातून बॅनर्जी यांना मोठा फटका

रेजीनगर मतदारसंघाच्या अगोदर ममता बॅनर्जी यांनाा नंदीग्राम मतदारसंघात मोठा फटका बसला आहे. बॅनर्जी यांनी या जागेवरून संचिता प्रधान डे यांना उमेदवारी दिली होती. परंतु बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बॅनर्जजी ऐनवेळी अडचणीत सापडल्या. त्यांना काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. दरम्यान आता नंदीग्राम मतदारसंघात फटका बसलेला असतानाच रेजीनगरात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार