दोन दिवसांवर मुलाचं लग्न होतं, आनंदात नाच नाच नाचला, नंतर कोसळला तो उठलाच नाही; Video व्हायरल

एक इसम लग्नसमारंभातील कार्यक्रमात सहभागी होऊन डान्स करत होता. मात्र डान्स करताना तो अचानक जमिनीवर कोसळला अन् उठलाच नाही. नेमकं काय झालं ?

दोन दिवसांवर मुलाचं लग्न होतं, आनंदात नाच नाच नाचला, नंतर कोसळला तो उठलाच नाही; Video व्हायरल
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 14, 2023 | 11:53 AM

अयोध्या : आयुष्य अतिशय बेभरवशाचं आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. अशीच एक घटना अयोध्या येथे घडली आहे. शेजाऱ्यांच्या घरात लग्न होतं, म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन नाचणाऱ्या (man fell down while dancing) एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू (died due to heart attack) झाल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. तो पाहून सर्वच हळहळत आहेत. दु:खद बाब म्हणजे मृत इसमाच्या मुलाचे लग्न अवघ्या दोन दिवसांवर होतं, मात्र त्याच्या अचानक जाण्याने हसतखेळतं घर आता शोकात बुडालं आहे.

ही दु:खद घटना अयोध्येतील पटरंग भागातील बैगंबर नगर गावातील आहे. दिलशाद असे मृत इसमाचे नाव असून ते 45 वर्षांचे होते. त्यांच्या शेजारच्या घरात लग्नसमारंभ होता, तेही त्यात आनंदाने सहभागी झाले होते. लग्नापूर्वी तेथे नाचगाणी सुरू होती, दिलशाद हे इतरांसोबत गाण्याचा आनंद घेत नाचत होते. थोड्या वेळाने ‘खाइ के पान बनारस वाला’ हे गाणं सुरू झालं आणि दिलशाद यांनी मोठ्या जोशात नाचायला सुरूवात केली. मात्र अवघ्या काही वेळात नाचता नाचताच ते धाडकन जमिनीवर कोसळले. काय झालं हे क्षणभर आजूबाजूच्या लोकांना कळलंच नाही. मात्र दिलशाद जमिनीवर पडल्याचे दिसताच सगळे त्यांच्या आसापास गोळा झाले. कोणीतरी पाणी आणायला सांगितलं, त्यांच्या तोंडावर थोडं पाणीही शिंपडलं पण त्यनंतरही दिलशाद यांनी काहीच हालचाल केली नाही. ते तसेच पडून होते.

 

आनंदी वातावरण क्षणात झाले शोकाकुल

ते काहीच हालचाल करत नाहीत हे पाहून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे ऐकून सर्वच दु:खात बुडाले. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या शेजारी तर लग्न होतंच पण त्यांच्या स्वत:च्या मुलाचे लग्नही अवघ्या दोन दिवसांवर आले होते. 14 जुलै रोजी त्याचा विवाह होणार होता. त्यापूर्वी दिलशाद शेजारच्यांच्या आनंदात सहभागी होण्यास गेले होते अन् तेथेच त्यांची अखेर झाली.

आधीही आला होता हार्ट ॲटॅक ?

दिलशाद यांच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वजण हळहळले. शेजारील घरातही दु:खाचे वातावरण आहे. तर त्यांच्या घरातील आनंदच कोणीतरी हिरावून घेतला आहे. त्याच्या मुलाचेही दोन दिवसांनी लग्न लागणार होते, मात्र आता तेथील आनंदी वातावरण अतिशय शोकाकुल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलशाद यांना यापूर्वीही हार्ट ॲटॅक आला होता. तेव्हा त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले होते व ते वाचले. मात्र यावेळेस त्यांना आला हार्ट ॲटॅक जबर होता, ज्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला.