दोन मुलांची आई गेली BFला भेटायला, मिठी मारताच… समोर येऊन उभा राहिला नवरा
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात दोन मुलांची आई असलेली महिला तिच्या 20 वर्षीय बॉयफ्रेंडला भेटायला गेली. हे नवऱ्याला कळताच तो देखील तेथे पोहोचला. पुढे जे काही झाले सर्वजण पाहातच बसले.

‘आपल्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या माणसाशी तिने लग्न केलं’ हे वाक्य ऐकायला जरी विचित्र असलं तरी आज काल हाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. मुलगा असो किंवा मुलगी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींना डेट करतात आणि बहुतेक वेळा पुढे जाऊन लग्न देखील करतात. कारण प्रेमाला वयाचे बंधन नसते. अशीच एक घटना समोर आली आहे. दोन मुलांची आई असलेली महिला 20 वर्षीय तुरूणाच्या प्रेमात पडली. ती तरुणाला भेटायला गेली तेवढ्यात तेथे पती आला. नंतर जे घडलं सर्वजण पाहातच बसले.
वाराणसी रेल्वे स्टेशनवर जेव्हा रस्त्याच्या कडेला दोन मुलांची आई एका २० वर्षीय तरुणाला भेटायला आली तेव्हा मोठी खळबळ माजली. महिला आल्याची माहिती मिळताच तिचा पतीही तिथे पोहोचला. त्याने आपल्या पत्नीला रंगेहात पकडले. रस्त्याच्या मध्यभागी पतीने जेव्हा पत्नीला पकडले, तेव्हा महिला हट्टाला पेटली आणि तरुणाला घट्ट मिठी मारून उभी राहिली. ती म्हणाली की ती याच तरुणाबरोबर राहू इच्छिते.
महिला आणि कुटुंब यांच्यामध्ये वाद सुरु असताना प्रियकराने तिला सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला काही ऐकली नाही. तिने प्रियकराला घट्ट मिठी मारून हात पकडून ठेवला होता. त्यामुळे भर रस्त्यात नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती. बराच वेळ रस्त्यावर गोंधळ सुरू राहिला, पण नातेवाईकांमध्ये वादविवाद झाल्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात महिलेच्या भावना आणि पतीची प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसत आहेत. हा प्रकरण केवळ स्थानिक लोकांसाठी चर्चेचा विषय बनला नाही, तर समाजामध्ये नात्यांच्या गुंतागुंतीलाही उजागर करतो.
महिलेच्या या स्थितीने असा प्रश्न उपस्थित केला आहे की, एखादी व्यक्ती आपले कुटुंब सोडून दुसऱ्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ शकते का? या घटनेने कौटुंबिक संबंध आणि प्रेम यांच्यातील संघर्षही दाखवला आहे. या प्रकरणाची कुठेही तक्रार केल्याची माहिती समोर आलेली नाही. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये वाढत असलेली अस्थिरता दर्शवतात. काहींनी महिलेच्या निर्णयाला समर्थन दिले, तर काहींनी ते चुकीचे ठरवले. या घटनेने हेही दाखवले की प्रेम आणि निष्ठा यांच्यातील सीमा कधीकधी अस्पष्ट होतात.