‘सूनेने दीरासोबत लग्न करावं, जे मूल जन्माला येईल, त्याला…’, शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांचे विचार
शहीद कॅप्टन अंशुमन यांना मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी सुनेवर अनेक आरोप केलेत. "मी राष्ट्रपती भवनात गेलो, त्यावेळी शहीद कॅप्टन अंशुमनच्या घराचा पत्ता बदलण्यात आला होता. त्यावर मी आक्षेप घेतला" असं रवी प्रताप म्हणाले.

शहीद कॅप्टन अंशुमन यांना मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित करण्यात आलं. शहीद अंशुमन यांची आई आणि त्यांची पत्नी हा सम्मान स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात आलेल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह यांना किर्ती चक्राने सन्मानित केलं. स्मृती सिंह किर्ती चक्र घेऊन माहेरी निघून गेल्या. त्यानंतर शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी सूनेवर गंभीर आरोप केले आहेत. आता शहीद कॅप्टन अंशुमन यांचे वडील रवि प्रताप मीडियाशी बोलताना म्हणाले की, “ते आपल्या धाकट्या मुलाच लग्न स्मृतीशी लावून द्यायला तयार आहेत. जर स्मृतीला अंशुमनच्या आठवणींसह या घरात रहायच असेल, तर ती राहू शकते” अंशुमनचा धाकटा भाऊ स्मृतीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. स्मृती या घरासाठी सून आणि मुलगी दोन्ही आहे, असं ते म्हणाले.
शहीद कॅप्टन अंशुमन यांना मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित केल्यापासून त्यांच्या आई-वडिलांनी सुनेवर अनेक आरोप केलेत. सून माहेरी निघून गेल्याला बरेच दिवस झालेत. तिने स्वत:ला संभाळण्यासाठी वेळ मागितलेला. ती अजून घरी परतलेली नाही. काही सांगितलं सुद्धा नाहीय असं शहीद अंशुमन यांच्या आई-वडिलांच म्हणणं आहे. “धाकट्या मुलाशी लग्न केल्यानंतर जे मूल जन्माला येईल, त्याच्या पित्याच्या कॉलममध्ये अंशुमनच नाव लिहिलं जाईल. पण हे सर्व स्मृतीच्या निर्णयावर अवलंबून आहे” असं रवी प्रताप म्हणाले.
‘माझी ओळख हिसकावून घेतली’
“मी राष्ट्रपती भवनात गेलो, त्यावेळी शहीद कॅप्टन अंशुमनच्या घराचा पत्ता बदलण्यात आला होता. त्यावर मी आक्षेप घेतला” असं रवी प्रताप म्हणाले. “मला ते किर्ती चक्र ह्दयाला कवटाळायच होतं. पण मला साधा स्पर्श सुद्धा करु दिला नाही. माझी ओळख हिसकावून घेतली” असा आरोप रवी प्रताप यांनी केला.
