राजस्थानात खाजगी बसला भीषण आग, १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी एका खाजगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

राजस्थानात खाजगी बसला भीषण आग, १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
| Updated on: Oct 14, 2025 | 7:04 PM

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी मोठा अपघात झाला.जैसलमेर ते जोधपूरला जाणाऱ्या एका खाजगी बसला भीषण आगल्याने त्यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही बस वॉर म्युझियमजवळ उभी असताना अचानक या बसने पेट घेतला. यानंतर या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या किंचाळ्यांनी हा परिसर हादरला. या बसमध्ये ५७ प्रवासी बसले होते. यातील अनेक प्रवासी गंभीर भाजल्याने त्यांची प्रकृती चितांजनक आहे.या जखमी प्रवाशांना जवाहिर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमीवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

ही बस जैसलमेरवरुन जोधपूर येथे जात होती. जेव्हा ही बस वॉर म्युझियमच्याजवळ पोहचली, असताना अचानक बसमधून धुर येऊ लागला आणि काही क्षणात बस जळून खाक झाली. त्यामुळे कोणाला वाचवण्याची संधी मिळाली नाही. आग लागली तेव्हा बसमध्ये ५७ प्रवासी बसले होते. आग लागल्यानंतर काही प्रवासी खिडक्या आणि दरवाज्यातून बाहेर आले.परंतू काही प्रवासी अडकले आणि आगीच्या तावडीत सापडले. रस्त्यावरील लोकांनी या अपघाताची तक्रार पोलिस आणि अग्निशमन दलाला दिली.

आगीची माहिती मिळाताच पोलिस आणि फायरब्रिगेटची टीम घटनास्थळी पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसची आग विझवली.त्यानंतर आगीतील जखमी प्रवाशांना एम्ब्युलन्सच्या मदतीने जवाहिर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या आगातील १७ जखमी प्रवाशांना जवाहिर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे अन्य प्रवाशांवर उपचार सुरु करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.