
मे महिन्यात प्रवासाची तयारी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. खडगपूर रेल्वे विभागामध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा फटका विशेषतः टाटानगरमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे अचानक नियोजन बिघडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रद्द गाड्यांची यादी आधीच जाहीर केली आहे.
खडगपूर रेल्वे विभागात सध्या सांतरागाछी स्थानकावर यार्डचे पुर्नरचना काम वेगात सुरू आहे. यामुळे 2 मेपासून 18 मेदरम्यान या मार्गावरून धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या आहेत. विशेषतः शालीमार, पुरी, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणमकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे.
शालीमार-टाटानगर-शालीमार एक्स्प्रेस (12804/12803)
हावडा-राउरकेला-बडामपहाड एक्स्प्रेस (18005/18006)
पुरी-शालीमार साप्ताहिक एक्स्प्रेस (12888/12887)
तमरलिप्ति एक्स्प्रेस (12857/12858)
हावडा-चक्रधरपूर एक्स्प्रेस (18011/18012)
पोरबंदर-संत राघवजी कवी गुरु एक्स्प्रेस (12949/12950) 9 मे पासून रद्द
हावडा-चेन्नई मेल (12839/12840) 17 मे रोजी रद्द
पुरी-शालीमार धौली एक्स्प्रेस (12822/12821) 17 मे रोजी रद्द
विशाखापट्टणम-शालीमार विशेष (08508) 6 मे रोजी रद्द
प्रवाशांनी प्रवासासाठी बाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (enquiry.indianrail.gov.in) किंवा IRCTC अॅपवर गाडीची स्थिती तपासावी. तिकीट आधीच घेतले असल्यास आणि गाडी रद्द झाली असेल, तर IRCTC च्या नियमानुसार रिफंड मिळतो.
खडगपूर रेल्वे विभागात सुरू असलेली सुधारणा ही भविष्यातील अधिक गतिमान आणि सोयीस्कर रेल्वे सेवेसाठी महत्त्वाची आहे. मात्र, सध्या यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः मे महिना हा लग्नसराई, परीक्षांनंतरच्या सहली आणि यात्रांचा हंगाम असतो. अशा वेळी गाड्या रद्द होणं हे अनेक कुटुंबांचं नियोजन कोलमडवणारं ठरू शकतं.
रेल्वे प्रशासनाने अद्याप पर्यायी गाड्यांची घोषणा केलेली नाही. मात्र वाढत्या मागणीचा विचार करता, काही विशेष गाड्या किंवा मार्ग बदलाचे पर्याय प्रशासनाकडून देण्यात येऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वेच्या अधिकृत माहिती स्रोतांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.