AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोमधून प्रवास करताना अचानक कोसळला ‘तो’ उठलाच नाही… प्रवाशांमध्ये पसरली घबराट; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?

गेल्या काही काळात हार्ट ॲटॅक येऊन अनेक तरूणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. यामध्ये किशोरवयीन मुलांपासून ते ४०-५० वयोगटातील व्यक्तींचाही समावेश आहे. कमी वयातच हार्ट ॲटॅकमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

मेट्रोमधून  प्रवास करताना अचानक कोसळला 'तो' उठलाच नाही... प्रवाशांमध्ये पसरली घबराट; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?
| Updated on: Dec 11, 2023 | 10:26 AM
Share

नवी दिल्ली | 11 डिसेंबर 2023 : गेल्या काही काळात हार्ट ॲटॅक येऊन अनेक तरूणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. यामध्ये किशोरवयीन मुलांपासून ते ४०-५० वयोगटातील व्यक्तींचाही समावेश आहे. कमी वयातच येणाऱ्या हार्ट ॲटॅकमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मेट्रोमध्येही घडला आहे. तेथे एका एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला प्रवासादरम्यानच हार्ट ॲटॅक आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अवघ्या 25 वर्षांच्या या तरूण विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीत घडली असून मेट्रोप्रवासादरम्यानच तो विद्यार्थी खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मयंक गर्ग असे मृत तरूणाचे नाव आहे.

आयएसबीटी येथे जाण्यासाठी मेट्रो पकडली पण…

मृत विद्यार्थी मयंक गर्ग याने वल्लभगढ येथून मेट्रो पकडली आणि तो आयएसबीटी येथे जात होता. पण जवाहरलाल नेहरू मेट्रो स्टेशन जवळच त्याला हार्ट ॲटॅक आला आणि तो धा़कन खाली कोसळला. भर मेट्रोत घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी घाबरले. पण कोणीतरी प्रसंगावधान राखून त्याला मेट्रो स्टेशनबाहेर काढले आणि तातडीने मूलचंद रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मयंक याचा भाऊ मनोज कुमार याने यासदंर्भात अधइक माहिती दिली. मयंक हा एमबीबीएसचा विद्यार्थी होता. शनिवारी तो पलवल येथून मेट्रोने आयएसबीटी येथे जात होता, मात्र त्याचा तो प्रवास अर्धवटच राहिला. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, पण काही उपयोग झाला नाही. मयंक याने महाराष्ट्रातील वर्धा येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. रविवारी त्याला एका लेखी परीक्षेसाठी पंचकूला येथे जायचे होते, त्यासाठीच तो दिल्लीत गेला होता. मात्र त्याला ती परीक्षा देताच आली नाही.

अगदी फिट अँड फाईन होता मयंक, तरीही आला हार्ट ॲटॅक

अवघ्या 25 वर्षांचा असलेल्या मयंकला एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याला तब्येतीची काहीच तक्रार नव्हती, अगदी फिट अँड फाईन होता. मात्र तरीही त्याला अचानक हार्ट ॲटॅक आला आणि तोच जीवघेणा ठरला. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे गर्ग कुटुंबियांवर दुत:खाचा डोंगर कोसळला आहे. तो मूळचा हरियाणातील रहिवासी होता. अतिशय कष्टाने, अभ्यास करून, मेहनत करून त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. मात्र रुग्णांची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर