
कॅबिनेट ऑन सिक्युरिटीने भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल मरीन फायटर जेट खरेदी करण्याच्या ६३ हजार कोटींच्या मेगा डीला मंजूरी दिलेली आहे.या डीलवर लवकरच अंतिम मोहर लागणार असून त्यानंतर नौदलाला ही मरीन राफेल मिळणार आहेत. भारताला प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे. चीनचे एकीकडे समुद्रात प्राबल्य वाढत असताना ही डील झाली आहे. त्यामुळे या नव्या मरीन राफेलने नौदलाची ताकद कैक पटींनी वाढणार आहे.
या करारा प्रमाणे नौदलाला फ्रान्सची अत्याधुनिक २२ सिंगल सिटर आणि ४ ट्वीन सिटर राफेल मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. या लढाऊ विमानांना विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात केली जाणार आहेत. कॅबिनेट मंजूरी दिल्याच्या निर्णयानंतर आता संरक्षण मंत्रालय फ्रान्स सरकारशी कराराला अंतिम स्वरुप आणण्यासाठी अंतिम बोलणी करणार आहेत. आणि कराराची इतर प्रक्रीया पूर्ण करणार आहेत.
एकूण विमाने: 26
विमानांचा प्रकार : 22 सिंगल-सिटर आणि 4 ट्विन-सिटर
एकूण खर्च : 63,000 कोटी रुपयांहून अधिक
कुठे होणार तैनात : INS Vikrant विमानवाहू युद्धनौकेवर
या कराराचा एक भाग म्हणून यातील जेटची देखभाल, लॉजिस्टीक सपोर्ट, नौदलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि भारतात तयार होणाऱ्या काही भाग यासाठी तांत्रिक सहकार्य या करारात समाविष्ट केले आहे. या डीलनुसार भारतीय नौदलाच्या जवानांना राफेल मरीन उड्डाण आणि देखभालीचे देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राफेल मरीन जेटची पहीली डिलीव्हरी 2029 पर्यंत सुरु होऊ शकते. 2031 पर्यंत सर्व 26 जेट भारतीय नौदलाना मिळणार आहेत.
हे फायटर मरीन जेट आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत सारख्या विमानवाहू नौकावर तैनात केले जाणार आहेत. ही जेट फायटर जुन्या झालेल्या मिग-29 या लढावू विमानांची जागा घेणार आहेत.
राफेल मरीन जेट लढाऊ विमानांना खास विमानवाहू नौकांवरुन उड्डाण घेणे आणि लॅण्डींग घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात मजबूत लँडींग गिअर, अरेस्टर हुक्स आणि एसटीओबीएआर तंत्रज्ञान ( जे विमान कमी धावपट्टीवरुन वेगाने टेक ऑफ आणि लॅडींग घेण्यात मदत करते ) या करारालामुळे भारतीय नौदलाला जादा ताकद मिळणार आहे.
भारतीय नौदलासाठी राफेल मरीन हे जेट फायटर खास करुन समुद्री गरजांनुसार तयार केले आहे. हे जेट मेटियोर, एक्सोसेट आणि एससीएएलपी ( SCALP ) सारख्या खतरनाक आणि एडव्हान्स मिसाईल वाहून नेण्यात सक्षम आहे. ज्यामुळे याची युद्धातील क्षमता खूपच संहारक होणार आहे.
या AESA रडार ( Active Electronically Scanned Array ) लावण्यात आले आहे. त्यामुळे दुश्मनांच्या विमानांना वेगाने आणि अचूक ओळखण्यास मदत होणार आहे.
– तसेच या विमानात SPECTRA इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम आहे, त्यामुळे जेटला लपणे, शत्रूंच्या हल्लापासून स्वत:चा बचाव करणे आदी काम करणे सोपे होणार आहे.
– हे जेट मॅक 1.8 ( ध्वनीच्या दुप्पट वेगाने ) उड्डाण घेऊ शकते.
– या लढाऊ विमानाच्या वेग दर ताशी 1,850 किलोमीटर हून अधिक आहे.
– या जेटमध्ये हवेमध्ये उड्डाण घेत असताना इंधन भरण्याची सुविधा आहे. त्यामुळे हे मोठ्या दीर्घ पल्ल्याच्या मोहिमांवर तैनात करता येऊ शकणार आहे.