
देशाच्या हवाई दलाचे वैशिष्ट्य असलेल्या फायटर प्लेन मिग 21 ला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. गेली सहा दशकं भारताच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजणाऱ्या फायटर प्लेनला निरोप देताना भावूक वातावरण झालं होतं. चंदीगड एअरबेसवर या लढाऊ विमानाला अखेरचा निरोप देण्यात आला.गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मिग 21 फायटर प्लेन हवाई दलाच्या बलस्थानी होते. आता इतिहासाच्या पानात मिग 21 ची सुवर्ण अक्षरात नोंद झाली आहे. मिग 21 च्या ऑपरेशनल आठवणी आता या पुस्तकापुरत्या मर्यादित राहतील. मिग 21 हे लढाऊ विमान रशियाने (सोव्हिएत युनियन) 1950 च्या दशकात विकसित केले होते. त्यानंतर या विमानाने हवाई दलात आपला दबदबा निर्माण केला. मिग 21 लढाऊ विमान भारतात कधी आले? त्याची खासियत काय? हे फायटर प्लेन निवृत्त का केलं गेलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. भारतात मिग 21 हे लढाई विमान कधी आलं? भारताने 1962 नंतर मिग 21...