320 भारतीय अजूनही बेपत्ता, टेन्शन वाढले, परराष्ट्र मंत्रालयाची मोठी माहिती..

नेपाळमध्ये परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. पुराने मोठा हाहाकार माजवला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. नेपाळच्या या पुरात मोठ्या प्रमाणात भारतीय लोक अडकली आहेत. त्यांच्याबाबत आता माहिती मिळतंय.

320 भारतीय अजूनही बेपत्ता, टेन्शन वाढले, परराष्ट्र मंत्रालयाची मोठी माहिती..
Nepal
| Updated on: Aug 28, 2026 | 5:18 PM

नेपाळमधील विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडाली. अचानक आलेल्या पुराने सर्वकाही वाहून गेले. 1200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या पुरात जीव गेलेल्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. नेपाळमध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने लोक मोठ्या संख्येने तिथे फिरण्यासाठी जातात. भारतातूनही नेपाळमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत जास्त आहे. मात्र, पुरामध्ये अनेक भारतीय पर्यटक अडकली आहेत. काही सुरक्षित आहेत, तर काहींचा संपर्क होऊ शकत नाहीये. या पर्यटकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेपाळमध्ये मोठे बचावकार्य राबवले जात आहे. भारताने नेपाळला बचावकार्यात मदत करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, नेपाळने नकार दिला. भारतासोबत बऱ्याच देशांनी मदत देण्याबाबत संपर्क साधला.

भारताची मदत नेपाळमध्ये पोहोचली आहे. 10 टन वस्तू नेपाळमध्ये दाखलही झाल्या आहेत. मात्र, भारतीय पर्यटक काही सुरक्षित आहेत तर अजूनही 320 भारतीय पर्यटकांसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. ज्यामुळे चिंता ही अधिक वाढली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की 320 भारतीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली की, चीनच्या तिबेट भागातील 400 भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यात आला असून ते सर्व सुरक्षित आहेत. त्यांचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहे आणि चीनमधील भारतीय दूतावासही सतत काम करत आहे. जयस्वाल यांनी म्हटले की, सर्वात चांगली बाब म्हणजे पूरग्रस्त भागात अडकलेले 21 भारतीय आज दिल्लीत दाखल झाले.

हे भारतीय तामिळनाडू राज्यातील आहेत. आमच्या राजदूतांनी काल काठमांडूमध्ये त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत कसे आणले जाईल, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. सतत आम्ही त्यांच्या संपर्कातही आहोत. अजूनही 320 भारतीय पर्यटकांसोबत संपर्क झाला नाही. काही पर्यटक हॉटेलमध्ये आहेत. मात्र, या विनाशकारी पुरामुळे नेटवर्क नाही. अजूनही मोठा इशारा नेपाळला देण्यात आलाय.

Follow Us