Mission Gujarat | मोदींचं मिशन गुजरात! सभेतील संबोधनात शिक्षणावर फोकस! वाचा मोदींच्या भाषणातील 4 मोठे

2001 पूर्वी राजकोट येथे केवळ 9 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ 1100 जागा होत्या. सध्या इथं 30 खाजगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामध्ये आठ हजार जागा आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशी महाविद्यालये तयार करायची आहेत असंही मोदींनी सांगितले.

Mission Gujarat | मोदींचं मिशन गुजरात! सभेतील संबोधनात शिक्षणावर फोकस! वाचा मोदींच्या भाषणातील 4 मोठे
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 1:55 PM

नवी दिल्ली : मिशन गुजरात अंतर्गत, नरेंद्र मोदींनी आज अटकोट, राजकोट (Rajkot) येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी (Naredra Modi) आपल्या भाषणादरम्यान सौराष्ट्रातील राजकीय गणित जुळवण्यासाठी एनडीए सरकारच्या (NDA Government) 8 वर्षांच्या कामाचा तपशील पाटीदार समाजासमोर ठेवला. यासोबतच त्यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरही आपली योग्या रणनीती सांगितली. एनडीए सरकारने 8 वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात आपल्या सरकारने असे कोणतेही काम केले नाही, ज्यामुळे जनतेला नतमस्तक व्हावे लागले. गेली अनेक वर्षे आम्ही गरिबांची सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे असं पंतप्रधानांनी आयोजित सभेत आपलं मत मांडलं.

गरिबांचे कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिले

मागच्या आठ वर्षाच्या काळात आमच्या सरकारने असे कोणतेही काम केले नाही. की ज्यामुळे जनतेला कुठे नतमस्तक व्हावे लागेल. गेली अनेक वर्षे आम्ही गरिबांची सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला जागून आम्ही देशाच्या विकासाला नवी गती दिली आहे. आमचे सरकार नागरिकांना सुविधा 100 टक्के उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम राबवत आहे. प्रत्येक नागरिकाला सुविधा देणे हे उद्दिष्ट असेल, तेव्हा भेदभावही संपतो, भ्रष्टाचाराला वाव राहत नाही.

आमच्या सरकारने गरिबांच्यासाठी काय केले

गरिबांसाठी सरकार असेल तर ते त्यांची सेवा कशी करते हे मोदींनी समजून सांगितले. त्यांना सक्षम बनवण्याचे काम करते, हे आज संपूर्ण देश पाहत आहे. 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या संकटातही देशाने हे सातत्याने अनुभवले आहे. जेव्हा महामारी सुरू झाली, गरीबांसमोर खाण्यापिण्याची समस्या होती, तेव्हा आम्ही देशातील धान्याचे कोठार उघडले. आमच्या पालकांच्या जनधन बँक खात्यात थेट पैसे जमा केले. शेतकरी आणि मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. गरिबांचे स्वयंपाकघर चालू राहावे म्हणून मोफत गॅस सिलिंडरची व्यवस्थाही केली होती.

हे सुद्धा वाचा

9 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ 1100 जागा होत्या

2001 पूर्वी राजकोट येथे केवळ 9 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ 1100 जागा होत्या. सध्या इथं 30 खाजगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामध्ये आठ हजार जागा आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशी महाविद्यालये तयार करायची आहेत असंही मोदींनी सांगितले. गरीब घरातील पालकांनाही आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे अशी इच्छा असते. पण आगोदर तुम्हाला इंग्रजी येते का ? असं विचारलं जातं. हा गरिब विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे . त्यामुळे आम्ही नियमात बदल केला आहे. आता गुजराती शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले विद्यार्थीही इंजिनीअरिंग आणि मेडिकल पूर्ण करू शकतात.

आम आदमी पार्टी शिक्षणाचा मुद्दा आपल्या अजेंड्यामध्ये आघाडीवर ठेवते

शिक्षणाच्या मुद्द्यावर पीएम मोदींचे भाषण आता आम आदमी पक्षाच्या निवडणूक अजेंड्यातील कट असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यात कितपत यश येणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

आम आदमी पार्टी शिक्षणाचा मुद्दा आपल्या अजेंड्यामध्ये सर्वात वर ठेवते. पक्षाचे नेते प्रत्येक निवडणुकीत दिल्ली मॉडेलचा उल्लेख करताना दिसतात. त्यामुळे मोदींनी आपल्या भाषणात शिक्षणाचा उल्लेख केल्याची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.