‘लाडला’ आजारी पडला, आता ‘वंदे भारत’ दाखवणार जलवा; आमदाराच्या लेकीच्या लग्नात शाही स्पर्धा, बक्षिसात चक्क महिंद्रा थार!

बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची देशभरात चर्चा आहे. शिवांगीच्या लग्नात घोड्यांची शर्यत आयोजित करण्यात येणार असून विजेत्याला महिंद्रा थार रॉक्स गाडी बक्षिस म्हणून दिली जाईल. शिवांगीच्या लग्नाला देश विदेशातून पाहुणे येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता या स्पर्धेकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लाडला आजारी पडला, आता वंदे भारत दाखवणार जलवा; आमदाराच्या लेकीच्या लग्नात शाही स्पर्धा, बक्षिसात चक्क महिंद्रा थार!
anant singh daughter shivangi wedding national horse race
Image Credit source: social media
| Updated on: Nov 09, 2026 | 10:43 PM

Anant singh daughter wedding : बिहारमधील मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीचं लग्न सध्या चांगलंच चर्चेत आहे. या लग्नात पाहुण्यांसाठी एकापेक्षा एक भारी व्यवस्था केली जात आहे. पण या शाही लग्नात सर्वाधिक चर्चा रंगणार आहे ती घोड्यांच्या शर्यतीची. या शर्यतीत जिंकणाऱ्या घोड्याला आणि त्याच्या स्वाराला चक्क महिंद्रा थार रॉक्स गाडी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे.

अनंत सिंह यांची लहान मुलगी शिवांगी हिचं लग्न 25 नोव्हेंबर रोजी नदावां गावात होणार आहे. या लग्नासाठी गावात जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील घोडदौड स्पर्धाही रंगणार आहे. त्यासाठी गावात तब्बल 10 ते 12 एकर एवढी जागा सपाट करून रेस ट्रॅक तयार केला जात आहे. तसेच ही तगडी शर्यत पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठीही खास आसन व्यवस्था केली जात असल्याची माहिती आहे.

Loading...

विजेत्यांना मिळणार ही आकर्षक बक्षिसं

या स्पर्धेतील बक्षिसंही तितकीच भारी आहेत. पहिला क्रमांक मिळवणाऱ्या घोड्याला आणि त्याच्या स्वाराला महिंद्रा थार रॉक्स दिली जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला मोटारसायकल, तर तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्याला स्कूटर मिळणार आहे.

मात्र, या शर्यतीत अनंत सिंह यांचा लाडका घोडा लाडला धावणार की नाही, याबाबत सध्या संभ्रम आहे. लाडलाची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तो स्पर्धेत सहभागी होऊ शकेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हे घोडे शर्यतीत

मुख्य प्रशिक्षक इस्माइल यांच्या माहितीनुसार, वंदे भारत, क्रांतिवीर आणि श्याम हे घोडे मात्र शर्यतीसाठी तयार आहेत. त्यांचा सध्या जोरदार सराव सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतूनही घोडे आणि त्यांचे स्वार येणार आहेत. त्यामुळे मुलीच्या लग्नात रंगणारी ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिक लोकांमध्येही उत्सुकता आहे. आता लाडला मैदानात उतरणार की दुसरे घोडे बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us