हैद्राबाद, अहमदाबादमधूनच नव्हे अमेरिका आणि दुबईतून येणार पाहुणे, आमदारांच्या कन्येला फोनवर फोन
आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी सिंह हिच्या शाही विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अमेरिका, दुबईसह अनेक शहरांतून पाहुणे येणार आहेत. नववधूसाठी नवे घर बांधले असून, याच घरातून वरात निघणार आहे. लग्नानंतर शिवांगी अमेरिकेला जाणार आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून फोनवर फोन येत असून, लग्नाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी सिंह हिच्या शाही विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिवांगीचे सासरे रणविजय कुमार सिंह यांनी या लग्नाची मोठी माहिती दिली आहे. हैद्राबाद, अहमदाबाद, रायपूर, सुकमा, मेरठ आणि दिल्लीतूनच नव्हे तर अमेरिका आणि दुबईतूनही लग्नासाठी पाहुणे येणार आहेत, अशी माहिती रणविजय कुमार सिंह यांनी दिली आहे. शिवांगीच्या गृहप्रवेशासाठी पटणाच्या बिहटामध्ये नवीन घर बांधण्यात आलं आहे. बुधवारी या घरात विधीवत पूजा अर्चा करण्यात आली आहे. याच घरातून वरात निघेल आणि शिवांगी याच घरात पहिलं पाऊल टाकणार आहे.
ऋषिकेश कुमार याच्या बिहटा येथील घरीही लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. घर सजवण्यात येत आहे. नव्या नवरीसाठी नवीन घर बांधण्यात आलं आहे. कालच हा गृहप्रवेश झाला. पूजा अर्चा करण्यात आली. लग्नानंतर शिवांगीची पहिली एन्ट्री याच नव्या घरात होणार आहे. हळदीपासून लग्नाच्या सर्व गोष्टी या नव्या घरातच होणार आहे. याच नव्या घरातून सर्व वऱ्हाडी मंडळी बँडबाजाच्या सूरात लग्नाच्या ठिकाणी पोहचणार आहेत.
लग्नानंतर अमेरिकेला जाणार
20 तारखेपासून हळदी आणि इतर गोष्टी सुरू होतील. पटणाच्या दानापूर येथील ऑर्गेनो बँक्वेट हॉलमध्ये टिळा लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी नदवां गावात वरात पोहोचेल. तिथेच लग्न सोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी कुटुंबाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पाहुण्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था आदी सर्व गोष्टींचं नियोजन करण्यात आलं आहे. लग्नानंतर शिवांगी काही दिवस या नव्या घरात राहणार आहे. त्यानंतर ती अमेरिकेला जाणार आहे.
मित्रांचे फोनवर फोन
दरम्यान, ऋषिकेश कुमार यांना अमेरिका आणि दुबईत राहणाऱ्या त्यांच्या मित्रांचे फोनवर फोन येत आहेत. शिवांगीलाही ऋषिकेशच्या नातेवाईकांचे फोन येत आहेत. खासकरून मीडियातून लग्नाच्या तयारीच्या बातम्या वाचून या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना लग्नाची उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच ते ऋषिकेश आणि शिवांगीला फोन करून माहिती घेत आहेत. शुभेच्छा देत आहेत. काही मित्र तर मस्करीही करत आहेत. आम्ही लग्नाच्या बातम्या पाहिल्या. पण लग्नाला बोलावणार की नाही? अशी टिंगलटवाळीही हे मित्र करताना दिसत आहेत. ऋषिकेशच्या कुटुंबीयांच्या मते, या लग्नाला देशातील वेगवेगळ्या शहरातून लोक लग्नाला येणार आहेत.