AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, DA आणि HRA इतक्या टक्क्यांनी वाढवला

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या आधी मोठी गुडन्यूज आली आहे. केंद्र सरकारने आज दोन मोठे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. केंद्र सरकारने डीए आणि एचआरए दोन्ही वाढण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा कोणत्या शहरात किती केलीये वाढ.

मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, DA आणि HRA इतक्या टक्क्यांनी वाढवला
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 07, 2024 | 9:43 PM
Share

7th Pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी आनंदाची बातमी आली. होळीपूर्वी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांच्या घरभाडे भत्त्यातही 3 टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे. आता X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना HRA 27 टक्क्यांवरून कमाल 30 टक्क्यांपर्यंत वाढेल. एचआरएमध्ये या वाढीमुळे सरकारवर 9,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

कोणत्या शहरासाठी HRA किती असेल?

1. X वर्गात-

दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकाता यांना एक्स श्रेणीत ठेवण्यात आले आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 27 टक्के एचआरए मिळतो. 3 टक्क्यांनी वाढल्यानंतर ते 30 टक्के होईल.

2. Y श्रेणी-

पाटणा, लखनौ, विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा, गुवाहाटी, चंदीगड, रायपूर, राजकोट, जामनगर, वडोदरा, सुरत, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगाव, नोएडा, रांची, जम्मू, श्रीनगर, ग्वाल्हेर, इंदूर, भोपाळ, जबलपूर, उज्जैन, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सोलापूर, नाशिक, नांदेड, भिवडी, अमरावती, कटक, भुवनेश्वर, राउरकेला, अमृतसर, जालंधर, लुधियाना, बिकानेर, जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, मुरादाबाद, मेरठ, बरेली, अलीगढ, आग्रा, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, गोरखपूर, फिरोजाबाद, झाशी, वाराणसी, सहारनपूर ही शहरे येतात. येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 18 टक्के एचआरए मिळतो. तो 2 टक्क्यांनी वाढल्यानंतर ते 20 टक्के होईल.

3. Z श्रेणी-

X आणि Y श्रेणीतील शहरांव्यतिरिक्त इतर सर्व शहरांना Z श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 9 टक्के एचआरए मिळतो. 1 टक्क्यांनी वाढल्यानंतर ते 10 टक्के होईल.

कर्मचाऱ्यांचा एचआरए कसा वाढेल?

मंत्रिमंडळाने घरभाडे भत्त्यातही सुधारणा जाहीर केली आहे. महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर एचआरएचा सध्याचा दरही 27 टक्क्यांवरून 30 टक्के करण्यात आला आहे. हा X श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असेल. दुस-या श्रेणीमध्ये म्हणजेच Y मध्ये तो 2 टक्के असेल. त्याची सध्याची पातळी 18% आहे, ती वाढवून 20% केली जाईल. यानंतर झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 1 टक्क्यांनी वाढून 10% HRA मिळेल.

डीएही वाढला

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळाने डीएमध्ये 4% वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2014 पासून लागू होईल. ते मार्चअखेर पगारासह जमा केले जाईल. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल