Skymet Weather : यंदा ‘टायमिंग’ साधणार मान्सून, सलग चौथ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक बरसणार पाऊस

| Updated on: May 13, 2022 | 4:17 PM

मान्सूनची केरळमध्ये झालेली सुरवात ही मुख्यत्वे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही देशांतील सागरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवते. नुकत्याच आलेल्या 'असनी' चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागरात नेहमीपेक्षा लवकर बंद झाला आहे. या एकत्रित प्रभावामुळे अरबी समुद्राच्या मध्यभागावरील अॅण्टीसायक्लोन पुसला गेला आहे, ही मान्सूनची लाट वाढण्यासाठी आवश्यक होते.

Skymet Weather : यंदा टायमिंग साधणार मान्सून, सलग चौथ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक बरसणार पाऊस
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : (Meteorological Department) हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा (Rain) पाऊस अधिक तर होणारच आहे पण यंदाचे वेगळेपण म्हणजे तो वेळेत दाखल होणार असल्याचा अंदाज (Skymet) स्कायमेटने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीतच पाऊस बरसणार तर आहेच पण सरासरीच्या 98 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस यंदा बरसणार आहे. यंदा नियमित वेळी किंवा त्यापेक्षा आगोदरच पावसाला सुरवात होणार आहे. सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नियमित वेळी म्हणजेच 1 जून रोजीच मान्सूनची सुरवात होणार असल्याचे स्कायमेटने सांगितले आहे.

‘असानी’ चक्रीवादाळाचा असा हा परिणाम

मान्सूनची केरळमध्ये झालेली सुरवात ही मुख्यत्वे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही देशांतील सागरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवते. नुकत्याच आलेल्या ‘असनी’ चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागरात नेहमीपेक्षा लवकर बंद झाला आहे. या एकत्रित प्रभावामुळे अरबी समुद्राच्या मध्यभागावरील अॅण्टीसायक्लोन पुसला गेला आहे, ही मान्सूनची लाट वाढण्यासाठी आवश्यक होते. मान्सूनपूर्व पावसाचे केरळमध्ये दणक्यात आगमन होणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा केरळमध्ये नैऋत्य मॉन्सूनचे आगमन 26 मे होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटची विश्वासार्हता

स्कायमेट वेदर ही भारतातील सर्वात मोठी हवामान देखरेख आणि कृषी-जोखीम सोल्यूशन्स कंपनी आहे. स्कायमेट वेदर या भारतातील एकमेव खासगी हवामान अंदाज वर्तवणारी संस्था असून हीची स्थापना 2003 मध्ये झाली. तेव्हापासून विश्वासार्ह आणि सुलभ हवामान अंदाज देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. स्कायमेट स्वत: चे संख्यात्मक हवामान अंदाज मॉडेल चालविते तर संपूर्ण डेटा आणि माहिती साधनांद्वारे हवामान-आधारित सेवांची श्रेणी प्रदान करते.

हे सुद्धा वाचा

वेळेत पावसाचा शेतीला सर्वाधिक फायदा

मान्सून हा अनियमित आणि लहरी असाच आहे. त्यामुळे त्याचे आगमन होईपर्यंत केवळ तर्क-वितर्कावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, यंदा स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे जर वेळेत आगमन झाले तर त्याचा सर्वाधिक फायदा हा शेती व्यवसायाला होणार आहे. पावसाने दडी दिल्याने दरवर्षी दुबार पेरणीचे संकट ओढावते यंदा जर वेळेत आगमन झाले तर खरिपाच्या पेरण्या वेळेत होतील.