Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!

Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!
उत्पादनात घट झाल्याने डाळींच्या दरात वाढ झाली आहे.

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात.

राजेंद्र खराडे

|

May 13, 2022 | 3:36 PM

मुंबई : एकतर शेतीमालाचे दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाहीच पण ठरलेले दरही शेतकऱ्यांच्या मालाला मिळेल असे नाही. त्यामुळे पिकवणाऱ्यापेक्षा विक्री करणाऱ्याला व्यापाऱ्यांनाच अधिकचा फायदा होत आहे. किरकोळ बाजारात डाळींच्या दराने 120 रुपये किलो पर्यंत मजल मारली आहे तर ठोक बाजारपेठेमध्ये डाळीचे दर 80 ते 90 रुपये किलो असे आहेत. डाळींच्या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना आहे ना ग्राहकांना. मध्यस्ती असलेले व्यापारीच अधिकचा नफा कमावत आहेत.शिवाय आवक घटल्यामुळेही सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

ठोक बाजार अ्न किरकोळ विक्रीमधील तफावत

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात. त्यामुळेच बाजारपेठेतील दर आणि किरकोळ दर यामध्ये 22 रुपये ते 36 रुपयांची तफावत आहे.

अशी आहे दरातील फरक

मुंबई बाजार समितीमध्ये तूर 90 रुपये किलो तर किरकोळ बाजारपेठेत 120 रुपये किलो असे दर आहेत. चणा खुल्या बाजारपेठेत 60 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 90 रुपये, मसूर डाळ 84 रुपये तर किरकोळमध्ये 120 रुपये किलो याप्रमाणे दरात तफावत आहे. वाढत्या तफवातीचा फायद कष्टकऱ्यांना होणे गरजेचे आहे. मात्र, येथे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते हेच अधिकचा फायदा करुन घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

उत्पादनातही मोठी घट

निसर्गाच्या लहरीपणाचा तेवढाच परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाली आहे. सर्वच डाळींचे उत्पादन घटले होते. त्यामुळे विक्रमी दर मिळतील अशी अपेक्षा होती पण याचा थेट लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. शेतकरी ठरवून दिलेल्या किंमती शेतीमालाची विक्री तर करतात. पण त्यापेक्षा किरकोळ व्यापारी यांना अधिकचा फायदा आहे. त्यामुळे उत्पादन घटूनही दरवाढीचा अधिकचा फायद विक्रेत्यांना झालेला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें