Monsoon: नेपाळमध्ये विध्वंसानंतर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा कहर, IMD चा 26 राज्यांना अलर्ट, छत्री सोबत राहू द्या
Today Weather News: नेपाळमध्ये पुराचा हाहाकार दिसला. येथील दृश्य अत्यंत भयावह आहेत. आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा कहर दिसू लागला आहे. परिणामी हवामान विभागाने 26 राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे बाहेर पडत असाल तर छत्रीसोबत घेऊन जा.

नेपाळमध्ये पुराचा हाहाकर दिसला. महापूराने उत्तर नेपाळला तडाखा दिला. भारतातही मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादाळाचा कहर दिसू लागला आहे. हवामान खात्याने (IMD) 27 ऑगस्टसाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्रासह पूर्वोत्तर राज्यांना अलर्ट दिला आहे. काही भागात वाऱ्याचा जोर दिसेल. डोंगराळ भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात कोणत्याही एका राज्यासाठी हा इशारा नाही. दक्षिणेतील अनेक राज्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
27 ऑगस्ट रोजी दुपारी अचानक वातावरण बदल दिसू शकतो. दिल्लीसह मध्य भारतात काही ठिकाणी हवामानात बदल होईल. मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुटेल. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहिल. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेपाळमधील पूराचा फटका बिहारमधील सात ते आठ जिल्ह्यांना बसण्याची शक्यता आहे. त्या भागातही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
यासोबत झारखंड, मध्यप्रदेशासह उत्तर भारतातही हवामान कूस बदलेल. आसामवरही ढग जमा होत आहेत. बंगालच्या उपसागारावर चक्रीवादळाची शक्यता आहे. यामुळे मध्य आणि उत्तर भारतात गारी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राज्यात सोसाट्याचे वारे वाहिल. वीज पडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. काही भागात गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पूर्वोत्तर राज्यात दमदार पाऊस
पूर्वोत्तर भारतात हवामान बदलण्याची शक्यता आहे. आसामसह इतर राज्यावर ढग जमा होत असल्याचे चित्र तयार झाले आहे. या भागातही वादळाची शक्यता आहे. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, नागालँड आणि पूर्वोत्तर राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये सुद्धा दमदार पाऊस पडू शकतो. या भागात नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह दक्षिण भारतात मान्सून सक्रिय
दक्षिण भारतातील काही भागात तीन दिवस मान्सून सक्रिय असेल. महाराष्ट्रासह तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळम, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूतील पश्चिमी घाटातील जिल्ह्यांमध्ये पुढील एक आठवडा मान्सून सक्रिया असेल. मदुराई, शिवगंगा आणि रामनाथपूरम भागात येत्या 24 तासात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्र किनारपट्टीवरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.