तक्रारी वाढल्याने ऊर्जा मंत्री थेट विजेच्या खांबावर चढला; नंतर काय घडलं ते वाचाच!

शहरात ट्रिपिंगच्या समस्या वाढल्याने मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर (Pradhuman Tomar ) वीज कार्यालयात पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना ट्रिपिंगच्या तक्रारी येत असल्याचं सांगून त्याबाबतची अधिक माहिती घेतली.

तक्रारी वाढल्याने ऊर्जा मंत्री थेट विजेच्या खांबावर चढला; नंतर काय घडलं ते वाचाच!
Pradhuman Tomar
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:12 PM

भोपाळ: शहरात ट्रिपिंगच्या समस्या वाढल्याने मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर वीज कार्यालयात पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना ट्रिपिंगच्या तक्रारी येत असल्याचं सांगून त्याबाबतची अधिक माहिती घेतली. यावेळी लोड वाढल्याने आणि पक्ष्यांमुळे ट्रिपिंगची समस्या वाढत असल्याचं अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना सांगितलं. त्यानंतर मंत्री तोमर कार्यालयातून बाहरे पडले. वाटेत त्यांना विजेच्या एका खांबावर पक्ष्यांचं घरटं दिसलं. त्यानंतर ते थेट खांबावर चढले आणि त्यांनी हे घरटं काढून खांबावर साफसफाई केली. हा प्रकार पाहून जमलेले सर्वच जण मात्र अवाक् झाले. (MP Energy Minister Pradhuman Singh Tomar cleaned Garbage on transformer)

वीज कार्यालयातून ऊर्जा मंत्री प्रद्युम्न तोमर बाहरे पडले. तेव्हा मोती झीलच्या समोर एका ट्रान्सफार्मरवर त्यांना पक्ष्यांचं घरटं दिसलं. ते पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. वीज मुख्यालयाच्या समोरच मेन्टेनेन्समध्ये निष्काळजीपणा असेल तर शहरातील इतर भागात काय अवस्था असेल असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी शिडी मागवली आणि सर्वांच्या समोर ट्रान्सफार्मरवर चढून पक्ष्यांचं घरटं काढून टाकलं.

व्यवस्था बदलासाठी छोटेछोटे प्रयत्न महत्त्वाचे

तोमर यांनी या प्रकाराची ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांचा फोटोही शेअर केला आहे. छोट्या छोट्या प्रयत्नातूनच व्यवस्थेत महत्त्वाचे बदल होतात. मी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन त्यातून काही तरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. कोण काय म्हणेल? कोण काय विचार करेल? याची मी पर्वा करत नाही. आपण अजून काय चांगलं करू शकतो, हाच माझा उद्देश असतो, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कचरा हटवला

आपल्या विचारातून आणि कृतीतून समाजाला काय संदेश देऊ शकतो, या भावनेतूनच मी रोज काम करत असतो. माझ्यातल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्यातील उणीवा दूर करण्याचा प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. त्यासाठी सजग राहिलं पाहिजे. आज मोतीझील येथील एका ट्रान्सफार्मवर वरील कचरा साफ केला. अधिकाऱ्यांनाही असा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यासही सांगितलं आहे. लाईन मेन्टेनन्स आणि साफसफाई नियमित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (MP Energy Minister Pradhuman Singh Tomar cleaned Garbage on transformer)

संबंधित बातम्या:

साबरमती नदीच्या पाण्यातही कोरोना विषाणू आढळला, सर्व नमुने पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली!

Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 4 तास महत्त्वाचे , मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही लस मिळणार!

(MP Energy Minister Pradhuman Singh Tomar cleaned Garbage on transformer)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.