साबरमती नदीच्या पाण्यातही कोरोना विषाणू आढळला, सर्व नमुने पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली!

गुजरातमधील (Gujrat) अहमदाबादची लाईफलाईन असलेल्या साबरमती नदीत (Sabarmati river) कोरोना विषाणू आढळले आहेत. नदीतील घेतलेले सर्व नमुने संक्रमित आढळले आहेत.

साबरमती नदीच्या पाण्यातही कोरोना विषाणू आढळला, सर्व नमुने पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली!
Sabarmati river

गांधीनगर : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने आता पाण्यातही आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. गुजरातमधील (Gujrat) अहमदाबादची लाईफलाईन असलेल्या साबरमती नदीत (Sabarmati river) कोरोना विषाणू आढळले आहेत. नदीतील घेतलेले सर्व नमुने संक्रमित आढळले आहेत. साबरमती नदीसह अहमदाबादमधील अन्य जलस्त्रोत कांकरिया, चंदोला तलाव इथले सॅम्पल्सही पॉझिटिव्ह आढळले आहेत. (Coronavirus found in Gujrats Sabarmati river Kankria and Chandola lakes)

संशोधकांना गुजरातशिवाय तिकडे आसाममधील गुवाहाटी इथल्या नदीतही कोरोना विषाणू आढळला. भारु नदीतील सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत.

देशातील आठ संस्थाकडून अभ्यास

या सर्व सॅम्पल्समध्ये विषाणूंचं अस्तित्व अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. आयआयटी गांधीनगरसह देशातील 8 संस्थांनी मिळून हा अभ्यास केला. यामध्ये नवी दिल्लीतील जेएनयूमधील संशोधक विद्यार्थीही सहभागी होते.

गेल्यावर्षी कचऱ्यातील नमुने घेतले होते. त्यावेळीही कोरोना विषाणू आढळले होते. त्यानंतर आता नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये संशोधन केल्यानंतर, तिथेही हे विषाणू आढळले.

अहमदाबाद आणि गुवाहाटीचीच निवड का? 

गांधीनगर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान विभागाच्या मते, गेल्या वर्षी कचऱ्याचे सॅम्पल घेऊन संशोधन सुरु केलं होतं. त्यावेळी विषाणू असल्याचं लक्षात आलं होतं. या अभ्यासानंतर जलस्त्रोताबाबतही संशोधन सुरु केलं. अहमदाबादमध्ये सर्वाधिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत. याशिवाय गुवाहाटीतही असा एक प्लांट आहे. त्यामुळे या दोन शहरांची निवड करुन, तिथले नमुने घेण्यात आले.

संबंधित बातम्या 

कोरोनासाठी आमदारनिधीतील आणखी 1 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणार, अजित पवारांची माहिती

Mumbai Corona | मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर आणखी घसरला