ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही लस मिळणार!

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविल्यानंतर आता ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे पालिका तृतीयपंथीयांसाठी ’विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार आहे. (Special COVID-19 vaccination camp)

ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही लस मिळणार!
प्रातिनिधिक फोटो

ठाणे: परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविल्यानंतर आता ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे पालिका तृतीयपंथीयांसाठी ’विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार आहे. उद्या 19 जून रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. (Special COVID-19 vaccination camp held for eunuchs in thane)

ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोनाविरुद्धच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तृतीयपंथी देखील या लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, असं पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितलं.

धारकार्ड नसेल तरीही लसीकरण

या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर उद्या 19 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत लस घेता येणार आहे. तरी शहरातील सर्व तृतीयपंथीनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. या विशेष लसीकरणाबाबत काही शंका असल्यास 09167253130 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.

मॅनहोल्सची झाकणे उघडू नका

दरम्यान, शहरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पालिका आयुक्तांनी शहरवासियांना सावधानतेच्या सूचना केल्या आहेत. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी साचल्यास पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने मलवाहिनीवरील मॅनहोल्स उघडण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. ही बाब अत्यंत धोकादायक असून मॅनहोल्समध्ये पडून जीवितहानी होवू शकते. तरी कोणत्याही परिस्थितीत मलवाहिनीवरील झाकणे उघडू नयेत. तसेच पावसात चालताना काळजी घ्या, असं आवाह आयुक्त शर्मा यांनी केले आहे.

लगेच आपत्कालीन विभागाशी संपर्क साधा

मुसळधार पावसामुळे मलवाहिनीवरील मॅनहोल्सची झाकणे पाण्याच्या दाबामुळे मॅनहोल्सपासून बाजुला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातुन काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलवाहिनी चेंबर्सच्या झाकणाच्या खाली लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. तरीही, काही ठिकाणी चेंबर्सवरील आरसीसी झाकणे पाण्याच्या दाबामुळे बाजुला होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. तसेच त्वरीत उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधावा, असं आवाहन पालिकेने केलं आहे. (Special COVID-19 vaccination camp held for eunuchs in thane)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : …तर कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्यातच येईल : राजेश टोपे

साबरमती नदीच्या पाण्यातही कोरोना विषाणू आढळला, सर्व नमुने पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली!

पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहात?, मग ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा! 

(Special COVID-19 vaccination camp held for eunuchs in thane)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI