पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहात?, मग ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा! 

आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी लोक शक्य ते सगळे प्रयत्न करतात. परंतु, आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात, हे आपण लक्षात घेतच नाही.

पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहात?, मग 'हे' घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा! 
चेहर्‍यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, यासाठी आपण झोपण्याच्या अगोदर टोमॅटोचा रस आपल्या त्वचेला लावला पाहिजे. (टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

मुंबई : आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी लोक शक्य ते सगळे प्रयत्न करतात. परंतु, आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात, हे आपण लक्षात घेतच नाही. यामुळेच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात मुरूमं येतात. एकदा जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्य येण्यास सुरूवात झाली की, नंतर हे थांबवणे खूप अवघड होते. विशेष म्हणजे पिंपल्समुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. (Do this home remedy to get rid of pimples on the face)

आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी खास टिप्स सांगणार आहोत. पिंपल्स कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने अत्यंत फायदेशीर असतात. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे केवळ आपले वजन नियंत्रित करण्याचे काम करत नाहीतर आपल्या त्वचेवरील पिंपल्स घालवण्याचे देखील काम करते. यासाठी आपल्याला सात ते आठ कडुलिंबाची पाने लागणार आहेत. ही पाने बारीक करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या पिंपल्सवर लावा.

साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि चेहरा धुवा. हे आपण सतत केलेतर आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते. ब्लाइंड पिंपल्स सेबम, बॅक्टेरिया आणि घाण आपल्या रोम छिद्रांमध्ये एकत्र अडकतात, ज्यामुळे आपल्या त्वचेखालील छोटी गाठ तयार होते. ही छोटीशी गाठ खूप दुखते. हे सामान्य मुरुमांसारखे दिसत नाही, परंतु जेव्हा आपण त्यांना स्पर्श करता तेव्हा ते खूप दुखवते. अशा मुरुमांना नेहमीच दाबणे किंवा फोडणे टाळा.

चेहर्‍यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, जो त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे काम करतो. यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा कुस्कुरून त्यात लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये मसाज करा. कोरफड जेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील गडद काळे डाग दूर करण्यास मदत करतात. आपण कोरफड जेल थेट कोरफड वनस्पतीमधून काढून चेहऱ्यावर लावू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Do this home remedy to get rid of pimples on the face)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI