Weight loss : वजन कमी करण्यासाठी जिरे, बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्या, जाणून घ्या फायदे

Weight loss : वजन कमी करण्यासाठी जिरे, बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्या, जाणून घ्या फायदे
जिर, बडीशेप आणि ओव्याचे पाणी

कोरोना लाॅकडाऊन यामुळे गेल्या एक वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून आपण घरात आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 03, 2021 | 8:44 AM

मुंबई : कोरोना, लाॅकडाऊन यामुळे गेल्या एक वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून आपण घरात आहोत. बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. व्यायाम करण्यासाठी देखील आपण घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. आज आम्ही वजन कमी करण्यासाठी तुम्हाला एक पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. (Drinking cumin, Fennel and Ajwain water is beneficial for weight loss)

वजन कमी करण्यासाठीचे हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा बडीशेप, एक चमचा जिरे, एक चमचा ओवा आणि मध लागणार आहे. यासाठी दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. यानंतर या पाण्यात बडीशेप, जिरे आणि ओवा मिक्स करा. दहा मिनिटे हे पाणी तसेच उसळूद्या. त्यानंतर शेवटी या पाण्यात मध घाला. हे पाणी कोमट झाल्यावर प्या. हे पाणी दररोज सकाळी आपण पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या.

जिरे केवळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनीच भरलेले नसून ते अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. दीर्घ काळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी जोडली गेली आहे आणि यामुळे स्वयंप्रतिकारक परिस्थिती देखील उद्भवू शकते. जिरे पाणी पाचन फायद्यासाठी देखील ओळखले जाते. हे पेय युरीनद्वारे आपल्या शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करू शकते. वजन कमी करण्याचा जिरेचे पाणी एक आरोग्यदायी मार्ग आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यास मदत करते.

बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत. बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. म्हणूनच बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Drinking cumin, Fennel and Ajwain water is beneficial for weight loss)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें