सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या मुलीचे सासरे आरएसएसच्या जवळचे आहेत, पण..

खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती हिचे लग्न सारंग लखानी यांच्यासोबत झाले. त्यानंतर खास रिसेप्शनचे आयोजन दिल्लीत करण्यात आले. या रिसेप्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. आता रेवतीच्या लग्नाबद्दल बोलताना पहिल्यांदाच सुप्रिया सुळे दिसल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या मुलीचे सासरे आरएसएसच्या जवळचे आहेत, पण..
Supriya Sule
| Updated on: Aug 16, 2026 | 5:05 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचे लग्न सारंग लखानी याच्यासोबत झाले. दिल्लीत काही दिवसांपूर्वीच खास रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहिले. देशभरातील दिग्गज नेत्यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. नरेंद्र मोदी तब्बल 20 मिनिट रिसेप्शनमध्ये होते. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि शरद पवार यादरम्यान एकमेकांच्या मांडीला मांडी लावून गप्पा मारतानाही दिसले. रेवती सुळेचे सासरे अरुण लखानी मोठे उद्योजक असून भाजपाचे नेतेही आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.

अभिनेत्री सोहा अली खानच्या ऑल अबाउट हर (All About Her) या पॉडकास्टमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी काही गोष्टींवर भाष्य केले. रेवती सुळेच्या रिसेप्शनमध्ये भाजपाचे नेते मोठ्या संख्येने दाखल झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. यासोबत लग्नातही मोठे नेते मंडळी पोहोचले होते. त्यावरच आता स्पष्ट बोलताना सुप्रिया सुळे या दिसत आहेत.

सोहा अली खानने सुप्रिया सुळे यांना विचारले की, तुमच्या मुलीने भाजपाच्या जवळच्या व्यक्तीसोबत लग्न केले. यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, रेवतीचे सासरे आरएसएसच्या अत्यंत जवळचे आहेत. सारंग आणि रेवतीचे नाते वेगळे आहे. ते दोघे एकमेकांसोबत आनंदी आहेत तर मी आनंदी आहे. रेवतीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलताना सुप्रिया सुळे या दिसल्या आहेत.

मुंबईमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये रेवती आणि सारंग यांचे लग्न झाले. या लग्नाला सेलिब्रिटी मोठ्या संख्येने पोहोचले होते. त्यानंतर दिल्लीतही रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले. ज्याला जवळपास भाजपा नेत्यांनी हजेरी लावली होती. रेवती आणि सारंग यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. विशेष म्हणजे अमित शाह आणि राहुल गांधी एकाच वेळी या रिसेप्शनला पोहोचले होते. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. शरद पवारही नीट पेपरफुटीदरम्यान मोदींच्या भेटीला पोहोचले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us