AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC मध्ये 50 लाख जिंकणारी तहसीलदार अटकेत, 2.57 कोटींच्या घोटाळ्यात नाव

Amita Singh Tomar : अमिता सिंह तोमर या तहसीलदार महिलेने या शोमध्ये भाग घेऊन 50 लाख रुपये जिंकले होते. मात्र आता आता अमिता यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

KBC मध्ये 50 लाख जिंकणारी तहसीलदार अटकेत, 2.57 कोटींच्या घोटाळ्यात नाव
TehsildarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 27, 2026 | 7:34 PM
Share

कौन बनेगा करोडपती हा भारतातील एक लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये भाग घेणाऱ्या अनेकांचे नशीब पालटले आहे. मध्य प्रदेशमधील अमिता सिंह तोमर या तहसीलदार महिलेने या शोमध्ये भाग घेऊन 50 लाख रुपये जिंकले होते. मात्र आता आता अमिता यांना अटक करण्यात आली आहे. श्योपुर जिल्ह्यातील बडोदा तहसीलमध्ये 2021 साली उघड झालेल्या सुमारे अडीच कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने पोलिसांनी त्यांना ग्वालियरमधील त्यांच्या घरातून अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मध्य प्रदेशमधील विजयपूर येथील अमिता सिंह तोमर यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये 50 लाख रुपये जिंकले होते, त्यामुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली होती. मात्र आता त्यांचे नाव पूर मदत घोटाळ्यात समोर आले आहे. यानंतरही त्या बराच काळ पदावर होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आगाऊ जामीन याचिका फेटाळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना विजयपूर तहसीलच्या पदावरून हटवले होते. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

पूर मदत घोटाळ्यात 110 जण आरोपी

पूर मदत घोटाळा हा घोटाळा ऑडिट तपासणीदरम्यान समोर आला होता. तपासात असे समोर आले की अनेक बनावट आणि अपात्र लोकांच्या नावावर मदतीची रक्कम काढण्यात आली होती, ही रक्कम खऱ्या पीडितांना मदत देण्यात आलेली नाही. कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारी तिजोरीची लूट करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक, गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान SDOP स्तरावरील अधिकाऱ्यांनी 110 जणांना आरोपी बनवले आहे. यातील अनेकांना अटक करण्यात आली आहे.

SP सुधीर अग्रवाल यांनी दिली महत्त्वाची माहिती

श्योपुरचे SP सुधीर कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या घोटाळ्यात अमिता सिंह तोमर यांचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे मिळाले आहेत. सध्या तपास सुरू आहे, यातून आणकी काही लोकांची माहिती समोर येऊ शकते. दरम्यान, अटकेपूर्वी अमिता सिंह तोमर विजयपूरहून ग्वालियरला गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे त्या परदेशात पळून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

2.57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार

अमिता सिंह तोमर यांना अटकेनंतर श्योपुर न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी त्यांना महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. तपासादरम्यान हेही समोर आले आहे की, 2021 मधील पुरानंतर मदत वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता करण्यात आली. 794 खऱ्या गरजूंना मदत देण्याऐवजी 127 बनावट लोकांना जवळपास 2.57 कोटी रुपये वाटण्यात आले. हे सर्व लोक आरोपींचे नातेवाईक होते.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान