AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dr. Rameshwar Rao | डॉ. रामेश्वर राव जुपल्ली यांचा चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणा पुरस्काराने सन्मान

"चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणा" पुरस्कार ही चॅम्पियन्स ऑफ चेंज राष्ट्रीय पुरस्काराची राज्यस्तरीय आवृत्ती आहे. धैर्य, सामुदायिक सेवा आणि सर्वसमावेशक सामाजिक विकासाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या महान कार्याचा याद्वारे सन्मान केला जातो.

Dr. Rameshwar Rao | डॉ. रामेश्वर राव जुपल्ली यांचा चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणा पुरस्काराने सन्मान
डॉ. रामेश्वर राव जुपल्ली
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 11:08 AM
Share

माय होम ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. रामेश्वर राव जुपल्ली (Dr. Rameshwar Rao) यांना 25 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे आयोजित समारंभात “चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणा” (Champions of Change Telangana Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी सरन्यायाधीश आणि NHRC चे अध्यक्ष न्यायमूर्ती केजी बालकृष्णन यांनी हा पुरस्कार प्रदान केला. गांधीवादी मूल्यांना चालना देण्यासाठी “चॅम्पियन्स ऑफ चेंज” या भारतीय पुरस्कारासाठी डॉ. रामेश्वर राव जुपल्ली यांची निवड के. जी. बालकृष्णन यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या समितीने केली. “सध्या देशात इतरत्र मंदीची लाट असतानाही तेलंगणात रिअल इस्टेट आणि आयटी ही दोन महत्त्वाची क्षेत्रं तेजीत आहेत. गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे आणि तेलंगणा सरकारद्वारे स्वीकारलेल्या अनुकूल धोरणांमुळे हे शक्य झाले आहे.” असं या प्रसंगी डॉ. रामेश्वर राव म्हणाले.

चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणा

“चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणा” पुरस्कार ही चॅम्पियन्स ऑफ चेंज राष्ट्रीय पुरस्काराची राज्यस्तरीय आवृत्ती आहे. धैर्य, सामुदायिक सेवा आणि सर्वसमावेशक सामाजिक विकासाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या महान कार्याचा याद्वारे सन्मान केला जातो. तेलंगणा राज्यातील दिग्गजांकडून प्रेरणा घेऊन हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

तेलंगणाला स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यांनी राष्ट्राच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणा हे तेलंगणाच्या मान्यवरांनी केलेल्या महान कार्याचा गौरव करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर आयोजन

आयएफआयई (IFIE) दरवर्षी भारतात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य-स्तरावर चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराचे आयोजन करते आणि ते सहसा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा भारतातील प्रमुख व्यक्तींद्वारे प्रदान केले जातात. श्री नंदन झा हे चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्डचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

पुरस्कारार्थींमध्ये कोणाकोणाचा समावेश

चॅम्पियन्स ऑफ चेंज तेलंगणाच्या इतर यशवंतांमध्ये पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि भारतीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ नागेश्वर रेड्डी, उद्योग, वाणिज्य आणि आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाचे प्रधान सचिव जयेश रंजन, पद्मभूषण विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, अभिनेते मुकेश री, तेलगू चित्रपट अभिनेता घटामनेनी महेश बाबू , तेलगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन आणि लोहिया समूहाचे अध्यक्ष कन्हैयालाल लोहिया यांचा समावेश आहे.

याशिवाय कोमंदुरी रामाचारी (पार्श्वगायक आणि संगीतकार), डॉ. सुकांता कुमार जेना, डॉ. पेद्दिरेड्डी श्रीधर, नरसी रेड्डी पोशम, बी महेंद्र रेड्डी, डॉ. पोन्नी एम कॉन्सेसाओ, शेषाद्री वंगाला, नरेंद्र राम नंबुला, सरस्वती अन्नदाता, भार्गवी अमिरिनेनी, चिलागानी संपत कुमार स्वामी, स्टीफन रवींद्र, ज्योत्सना रेड्डी, सुधा राणी रेड्डी, शशी जालिगामा, मनीष दोशी, दिरिसाला नरेश चौधरी, डॉ. राजा थंगप्पन यांनाही या कार्यक्रमात पुरस्काराने गौरवण्यात आले.

संबंधित बातम्या :

जगात भारी कल्याणकर: कासम शेख यांना आयटीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा MVP पुरस्कार; महाराष्ट्रातून शेख एकमेव

प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान!; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.