पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी कोरोना लसीकरणाचा विक्रम, 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना लस

| Updated on: Sep 17, 2021 | 8:06 PM

17 सप्टेंबर म्हणजे आज 2 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. दुपारी दीड वाजेपर्यंत देशातील लसीकरणाचा आकडा 1 कोटीच्या पुढे गेला होता. त्यानंतर दुपारी अडीच वाजता सव्वा कोटी, साडे तीन वाजता 1 कोटी 60 लाखाच्या पुढे लसीकरण झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा आधीच केली होती.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी कोरोना लसीकरणाचा विक्रम, 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारतीय जनता पार्टीकडून चालवण्यात आलेल्या मेगा कोरोना लसीकरण कार्यक्रमामुळे लसीकरणाचा नवा विक्रम तयार झाला आहे. 17 सप्टेंबर म्हणजे आज 2 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. दुपारी दीड वाजेपर्यंत देशातील लसीकरणाचा आकडा 1 कोटीच्या पुढे गेला होता. त्यानंतर दुपारी अडीच वाजता सव्वा कोटी, साडे तीन वाजता 1 कोटी 60 लाखाच्या पुढे लसीकरण झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा आधीच केली होती. आज मेगा लसीकरणाचा कार्यक्रम देशभरात राबवला जाईल, असंही भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं. (BJP’s corona vaccination campaign on PM Narendra Modi’s birthday was a success)

देशभरात राबवण्यात आलेल्या मेगा लसीकरण कार्यक्रमासाठी भाजपने देशभरात जवळपास 6 लाख स्वयंसेवकांची फौज उभी केली होती. हे स्वयंसेवक लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी मदत करत होते. या स्वयंसेवकांनी लोकांना लसीकरणाच्या रांगेत पोहोचण्यासाठी आणि त्यांना इतर मदत मिळवून दिली. भाजपकडून राबवण्यात आलेली ही लसीकरण मोहिम जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका दिवसात दीड कोटी नागरिकांना लस देण्याचं लक्ष्य भाजपने आखलं होतं.

लसीकरणाचा विक्रम करण्याची भाजपची योजना

भाजपकडून 2014 पासून पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिन सेवा दिवसाच्या रुपात साजरा केला जात आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोंदीच्या वाढदिवसाला लसीकरणाचा विक्रम करण्याची योजना आखली होती, जी यशस्वी ठरताना दिसत आहे. कोविन अॅपवरुन मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी दीड वाजता 1 कोटी 71 हजार 776 लोकांनी लस घेतली. ही संख्या आजपर्यंतच्या एका दिवसातील लसीकरणापेक्षा मोठा आहे.

भाजपकडून 20 दिवसांचं ‘सेवा दिवस’ अभियान

2014 पासून आतापर्यंत भाजपकडून एक आठवड्याचं सेवा दिवस अभियान राबवण्यात आलं आहे. मात्र, यंदा या अभियानाचा कालावधी वाढवून 20 दिवस करण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांचं 20 वर्षाचं सार्वजनिक जीवन लक्षात घेता हे अभियान 20 दिवस करण्यात आलं आहे.

सेवा व समर्पण अभियान

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या जन्मदिनी म्हणजे शुक्रवारपासून 7 ऑक्टोबरपर्यंत जनतेत जाऊन 20 दिवसांचं सेवा व समर्पण अभियान राबवलं जात आहे. सोबतच पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय वाटचालीला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही भाजप आनंद साजरा करत आहेत. नरेंद्र मोदी हे 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर मागील 7 वर्षापासून ते देशाचे पंतप्रधान आहेत.

इतर बातम्या :

भाजपचे नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत का? अजित पवारांनी सविस्तर सांगितलं

महाविकास आघाडी सरकारला झटका! राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडेंचा राजीनामा

BJP’s corona vaccination campaign on PM Narendra Modi’s birthday was a success