CJP Protets : राजीनामा झाला, आंदोलन संपलं, आता सीजेपी काय करणार, कॉकरोचची सर्वात मोठी घोषणा; महत्त्वाची अपडेट समोर!

सीजेपीच्या तिन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यानंतर आता सीजेपीने आम्ही आमचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा तसेच सीजेपीतर्फे आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

CJP Protets : राजीनामा झाला, आंदोलन संपलं, आता सीजेपी काय करणार, कॉकरोचची सर्वात मोठी घोषणा;  महत्त्वाची अपडेट समोर!
cjp protets at delhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 5:51 PM

CJP Delhi Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर  सीजेपीच्या तिन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यानंतर आता सीजेपीने आम्ही आमचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा तसेच सीजेपीतर्फे आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आता या आंदोलनलानंतर पुढे काय होणार? सीजेपी नेमकं काय करणार? याबाबतही सीजेपीच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे.

नेमकी काय घोषणा झाली?

भारत सरकार आणि सीजेपीने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सीजेपीने आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, असे सांगितले आहे. तसेच नीट पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देऊ, असेही सरकारने सांगितले. त्यामुळे आता जंतर मंतरवरील सीजेपीचे आंदोलन आता संपले आहे. सर्व आंदोलक आता आपापल्या घरी जाणार आहेत.

सीजेपीचं काय होणार? पुढे काय रणनीती?

नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे सीजेपीचे आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला लाखों भारतीयांनी पाठिंबा दिला होता. आता सीजेपी पुढे काय करणार, असे विचारले जात आहे. याबाबतही सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. सरकारने सर्व मागण्या मान्य केलेल्या असल्या तरी या मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे सीजेपीने सांगितले आहे. आम्हाला शिक्षणव्यवस्थेत सुधारणा हवी आहे. त्यासाठी आम्ही पुढच्या काही दिवसांत सरकारला एक ड्राफ्ट पाठवणार आहोत. या ड्राफ्टवर सरकार विचार करणार आहे, असे सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले.

सरकारच्या निर्णयाची कॉपी मिळणार, अभ्यास करू

तसेच, सरकारने आंदोलकांवरील एफआयआर मागे घेतले जातील, अशी घोषणा केलेली आहे. परंतु सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या १५ ते २० कॉपीज आम्हाला सरकार देणार आहे. तीन ते चार दिवसात या निर्णयाची कॉपी मिळेल. याचाही आम्ही अभ्यास करू, असं सीजेपीने सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us