CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

काँग्रेसनेही नीट पेपरफुटी आणि सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेली मारहाण या मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा धारण केला आहे. विद्यार्थ्यांना झालेली मारहणा, नीट पेपरफुटी यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?
cjp and abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 2:55 PM

CJP Protest : दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, ही सीजेपीची प्रमुख मागणी आहे. आता हाच मुद्दा घेऊन विरोधी पक्षदेखील आक्रमक झाले आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात 21 जुलै रोजी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे जोरदार आंदोलन केले. या आंदोलनानंतर तसेच जंतर मंतरवर जमा झालेल्या हजारो आंदोलकांमुळे मोदी सरकारवर दबाव वाढला आहे. त्याच कारणामुळे आता केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्र सरकारचा प्रतिनिधी सीजेपीच्या प्रतिनीधींची भेट घेणार आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

जंतर मंतरवर रोजच गर्दी वाढत आहे. सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. या आक्रमक आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता आता सरकारने कोंडी फोडण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारचा प्रतिनिधी आता सीजेपीच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहे. याआधी काही तासांपूर्वी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांची भेट घेतली होती. वांगचूक यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भेटीमध्ये केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचादेखील समावेश होता.

सरकार संसदेत चर्चा करण्यास तयार

दुसरीकडे काँग्रेसनेही नीट पेपरफुटी आणि सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेली मारहाण या मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा धारण केला आहे. विद्यार्थ्यांना झालेली मारहणा, नीट पेपरफुटी यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच अगोदर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यानंतरच ससंदेत चर्चा अशी ठाम भूमिकाही काँग्रसने घेतली आहे. दुसरीकडे आम्ही संसदेत चर्चा करण्यास तयार आहोत, असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मात्र अद्याप सरकारने कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि सीजेपीच्या बैठकीत नेमकं काय होणार? सरकार सीजेपीची मागणी मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Follow Us