
Narendra Modi Watch : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांच्या एका-एका शब्दाला फार महत्त्व आहे. मोदी यांनी एखादे विधान केले तर त्याचे अनेक अर्थ काढले जातात. देशाचे प्रमुख असल्याकारणाने त्यांच्या पेहरावाचीही तेवढीच चर्चा होते. याआधी नरेंद्र मोदी हे नाव असलेला बंद गळ्याचा कोट परिधान केल्यानंतर मोदी यांच्यावर मोठी टीका झाली होती. आता त्यांच्या हातात असलेल्या एका घड्याळाची सगळीकडे चर्चा होत आहे. या घड्याळाचे डायल, त्यावरची डिझाईन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हातात दिसलेल्या एका घड्याळाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. हे घड्याळ अनेक अर्थांनी खास आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोदींच्या या घड्याळाच्या डायलमध्ये 1947 सालातील1 रुपयाचे नाणे आहे. मोदींनी हे घड्याळ सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या काळात अनेक कार्यक्रांत घातलेले आहे. याच घड्याळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या हातातील हे घड्याळ जयपूर वॉच कंपनीने तयार केलेले आहे. या घड्याळाचे नाव Roman Baagh असे आहे. या घड्याळात 1947 साली तयार करण्यात आलेले एक खरेखुरे नाणे आहे. या नाण्यावर भारतातील वॉकिंग टायगर आहे.
उपलब्ध माहितीनुसार Roman Baagh या घड्याळाची किंमत साधारण 5 हजार ते 60 हजार रुपये आहे. हे एक महागडे घड्याळ असल्याचे बोले जाते. जयपूर वॉच कंपनीकडून हे घड्याळ तयार करण्यात आले आहे. ही कंपनी गौरव मेहता यांनी उभारलेली आहे. जुने नाणे, टपालाचे तिकीट, पारंपरिक डिझाईन्स यांच्या मदतीने या कंपनीकडून घड्याळे तयार केले जातात. दरम्यान, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2015 मध्ये एक कोट परिधान केला होता. या कोटावर नरेंद्र मोदी असे लिहलेल्या पट्ट्या होत्या. याच कोटवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मोदींच्या अंगातील हा कोट तब्बल 10 लाखांचा आहे, अशी टीका तेव्हा खासदार राहुल गांधी यांनी केली होती. असे असताना आता मोदींच्या नव्या घडीची सगळीकडे चर्चा होत आहे.