
Naxal Encounter: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. सुरक्षा दलांनी ८ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांकडून संयुक्तपणे ही कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी या भागांत मोठ्या प्रमाणावर पोलीस दलास तैनात केले आहे. दरम्यान, एक कोटींचे बक्षीस असलेला विवेक दास्ते या चकमकीत ठार झाला आहे.
सुरक्षा दलांना घटनास्थळावरून एक इन्सास रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल आणि इतर वस्तू जप्त मिळाल्या आहेत. सोमवारी सकाळी पाच वाजता बोकारोच्या लालपाणी पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडा टोली आणि सोसोजवळ ही चकमक सुरू झाली. शोध मोहिमेसोबतच मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरूच आहे.
नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यासाठी स्थापन केलेले 209 कमांडो बटालियन फॉर रेजोल्यूट एक्शन (कोबरा) पथकाकडून ही अभियान राबवले जात आहे. ग्रामीण भागातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासून गोळीबाराचा आवाज येत आहे. चकमक अजूनही सुरु आहे. मारल्या गेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jharkhand | The Central Reserve Police Force, in a joint operation with state police, neutralised four naxals in an exchange of fire this morning in Lugu hills under Lalpania area of Jharkhand's Bokaro district. The troops have recovered one SLR and one INSAS rifle. No injury to…
— ANI (@ANI) April 21, 2025
झारखंडमधील चाईबासा भागात 12 एप्रिल रोजी आयईडी ब्लॉस्ट झाला होता. त्यात एका जवानाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी झारखंडमधील जरायकेला भागात एंटी नक्सल अभियान दरम्यान सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली.
एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी विवेक दस्ते याच्याबद्दल पथकाच्या हालचालींबद्दल गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिस कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात ८ नक्षली ठार झाले. तसेच मृतांमध्ये २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेले कुख्यात नक्षलवादी अरविंद यादव आणि १० लाख रुपयांचे बक्षीस असलेले साहेब राम मांझी यांचा समावेश आहे.