NEET UG Re- Exam : पोटात दुखतंय म्हणून वॉशरुममध्ये गेला अन्…, मुलंच नाही मुलीही कॉपी करण्यात पुढे, विद्यार्थीनीच्या कपड्यांमध्ये काय आढळलं?

NEET UG Re- Exam : NEET चे पेपर फुटल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि 21 जून रोजी अखेर परीक्षा पार पडली. NEET च्या परीक्षांमध्ये पुन्हा कोणते अनुचित प्रकार घडू नये म्हणून कठोर सुरक्षा ठेवण्यात आलेली. परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांचे कॉपी प्रकार समोर आले आहे. जे हैराण करणारे आहेत.

NEET UG Re- Exam : पोटात दुखतंय म्हणून वॉशरुममध्ये गेला अन्..., मुलंच नाही मुलीही कॉपी करण्यात पुढे, विद्यार्थीनीच्या कपड्यांमध्ये काय आढळलं?
| Updated on: Jun 22, 2026 | 1:33 PM

NEET UG Re- Exam : 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या NEET UG Re- Exam ला लीक प्रूफ करण्यासाठी सरकारने तब्बल 51ल हजार जॅमर्स आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी कॉपी प्रकार समोर आले आहे. ज्यामुळे खळबळ माजली आहे. हैदराबादमधून कॉपीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिने सुरक्षा यंत्रणांनाही अवाक् केलं. आदिबटला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परीक्षा केंद्रावर, परीक्षेदरम्यान वॅशरुममध्ये मोबाईल फोनचा वापर करून गुगलवर उत्तरं शोधताना 18 वर्षीय विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

सकाळी 7 वाजताच विद्यार्थ्यांने फ्लश टँकमध्ये लपवला फोन…

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी अचमपेटचा रहिवासी आहे. त्याचं परीक्षा केंद्र रागनगुडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये होतं. सुरक्षा उपाययोजनांना बगल देण्यासाठी या विद्यार्थ्याने अत्यंत चलाखीची पद्धत वापरली. शाळेच्या वॅशरुममधील व्हेंटिलेटरची खिडकी शाळेच्या बाहेरील संरक्षक भिंतीला लागूनच असल्याने, हा विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच, म्हणजेच सकाळी ७ च्या सुमारास तिथे पोहोचला आणि त्याने बाहेरून व्हेंटिलेटरद्वारे स्वच्छतागृहाच्या आत मोबाईल फोन ठेवला.

पोट दुखत असल्याचं नाटक आणि गुगल सर्च…

परीक्षा सुरू झाल्यानंतर, संबंधित विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाकडे अचानक पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली आणि वॅशरुममध्ये जाण्याची परवानगी मागितली. संपूर्ण परीक्षा केंद्रासाठी ते एकमेव वॅशरुमम होतं आणि ते शाळेच्या मुख्य इमारतीपासून बऱ्याच अंतरावर असल्याने, त्या विद्यार्थ्याला तिथे मोबाईल ठेवणं सुरक्षित वाटलं.

कशी झाली पोलखोल

विद्यार्थ्याला वॅशरुममध्ये जाऊन बराच काळ लोटला… अखेर परीक्षा कक्षातील पर्यवेक्षकाला संशय आला. त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी पाठवलं. वॅशरुममध्ये पोहोचल्यानंतर मुलगा कॉपी करत असल्याचं लक्षात आलं. विद्यार्थी मोबाईल फोनचा वापर करून थेट गुगलवर NEET परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरं शोधत असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

जयपूर येथून देखील मोठं प्रकरण समोर…

जयपूरमधील बिंदायाका येथील सरकारी शाळेत झालेल्या NEET पुनर्परीक्षेदरम्यान विद्यार्थीनीकडे मोबाईल फोन सापडल्याची घटना समोर आली आहे. ही माहिती मिळताच डीसीपी प्रशांत किरण आणि इतर पोलीस अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचले व त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

प्राथमिक माहितीनुसार, हिमांशी अशी पटले असं विद्यार्थीनीचं नाव आहे. ती नियोजित वेळेच्या 10 मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर पोहोचली होती. एका महिला पर्यवेक्षकाला संशय आल्याने सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिची झडती घेण्यात आली; त्यावेळी तिच्या शर्टमध्ये लपवून ठेवलेला मोबाईल फोन आढळून आला. आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Follow Us