भाजपचं आंदोलन कशासाठी? नरेंद्र मोदी मला का घाबरले? पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी रोखठोक मुद्दे मांडले

| Updated on: Mar 25, 2023 | 2:30 PM

भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशभर राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी यासाठी जोरदार आंदोलन केले आहे. त्यावर राहुल गांधी यांनी पलटवार करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपचं आंदोलन कशासाठी? नरेंद्र मोदी मला का घाबरले? पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी रोखठोक मुद्दे मांडले
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत भारतीय जनता पार्टी ज्या मुद्यावरून आरोप करत आहे तो मुद्दा नसल्याचे स्पष्टीकरण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. याशिवाय राहुल गांधी म्हणाले भारतीय जनता पार्टी मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी ओबीसीचा मुद्दा समोर आणत असल्याचा दावा केला आहे. याशिवाय माझा मूळ मुद्दा हा आहे की गौतम अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुणी टाकले ? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

खरंतर राहुल गांधी यांची नुकतीच खासदारकी रद्द झाली आहे. त्यावरुन देशभर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कॉंग्रेस रस्त्यावर उतरली असून निदर्शने करीत आहे. तर दुसरीकडे ओबीसीची राहुल गांधी यांनी माफी मागावी ही मागणी करत त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करीत आहे.

राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी मला घाबरले असून ते विचलित झाले आहे. त्यामुळे ते अशा स्वरूपाचे निर्णय घेत आहे. त्यामध्ये माझ्या प्रश्नांना उत्तर का देत नाही असेही राहूल गांधी यांनी सवाल विचारला आहे .

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुणी टाकले त्यांना जेलमध्ये टाका अशी मागणी केली आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी माझा मुद्दा क्लिअर आहे. पण भाजप विषयांतर करण्यासाठी ओबीसीचा मुद्दा समोर आणत असल्याची टीका केली आहे.

त्यासाठी संपूर्ण देशभर भाजप ओबीसीचा मुद्दा घेऊन आंदोलन करत आहे. पण माझा माफी मागण्याचा मुद्दा येत नाही. मी गांधी असून सावरकर नाही म्हणत भाजपाला डिवचलं आहे. तर दुसरीकडे माझ्या संसदेतील भाषणाला उत्तर का दिले नाही म्हणत जोरदार टीका केली आहे.

लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून विचारणा केली आहे. यामध्ये नियम पळाले जात नसल्याचे म्हंटले आहे. माझे संसदेतील भाषण का पटलवार ठेवले नाही ? माझ्या प्रश्नांची नरेंद्र मोदी यांना इतकी भीती का आहे ? असेही सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहे.