राहुल गांधी यांचं कोणतं भाषण सत्ताधाऱ्यांना खटकलं, पटलावरून भाषण हटवलं; राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं…

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये राहूल गांधी यांनी लोकसभेतील भाषणाचा मुद्दा उपस्थित करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांचं कोणतं भाषण सत्ताधाऱ्यांना खटकलं, पटलावरून भाषण हटवलं; राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 1:48 PM

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत संसदेत केलेल्या भाषणाला का उत्तर दिले नाही म्हणून काही सवाल उपस्थित केले होते. मी कुठल्याही कारवाईला किंवा धमकीला घाबरत नाही म्हणत राहुल गांधी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळेला राहुल गांधी यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर बोलणार नाही म्हणत संसदेतील भाषण पटलावरून का हटवलं ? असा सवाल उपस्थित केला आहे.

लोकसभा अध्यक्षांना माझे भाषण रेकॉर्डवर का नाही ठेवले ? राहुल गांधी यांनी मी त्याबबत केलेला पत्रव्यवहारला सुद्धा उत्तर दिले नाही असे सांगत मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी यावेळेला त्या भाषणात मी विचारलेल्या प्रश्नांना का उत्तर दिले नाही असाही सवाल राहुल गांधी विचारला आहे.

राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणात गौतम अदानी यांच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारले होते. गौतमी अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुठून आले याबाबत चौकशीची मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा

याशिवाय राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या सोबत नरेंद्र मोदी यांचे फोटो आहेत त्याबद्दल खुलासा मागविला होता. देशातील जनतेला गौतम अदानी आणि तुमचं जुनं नातं काय आहे याबद्दल माहिती विचारली होती.

याच दरम्यान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी भारत जोडो यात्रेचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. शिक्षण बेरोजगारीच्या संदर्भात राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेलती होती.

हेच भाषण पटलावर न ठेवल्याने राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्यावर उत्तर न आल्याने राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे राहुल गांधी यांच्यावर त्यानंतर कारवाई झाली आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी यावेळेला मी शांत बसणार नाही, मी तुरुंगात गेलो तरी मी प्रश्न विचारणे सुरूच ठेवेल म्हणत राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मी धमक्यांना घाबरणार नाही म्हणत थेट नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.