
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. काही व्हिडीओंमध्ये दहशतवादी थेट गोळ्या झाडताना दिसत होते. अनेक वर्षांपासून या हल्ल्याचा कट रचला जात होता. फक्त हेच नाही तर दहशतवाद्यांनी घटनास्थळी येऊन रेकी देखील केली होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात मोठा संताप बघायला मिळाला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. तपासात एका मागून एक धक्कादायक खुलासे या हल्लयाबद्दल होत आहेत. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्थ केली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू होती. शेवटी दोन्ही देशाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठक घेत शांतता करार केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता आठ महिन्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) एक मोठे यश मिळवले असून सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पाच संशयित आणि दोन दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. पाकिस्तानस्थित लष्कर ए तैयबा (LeT) आणि द रेझिस्टन्स फ्रंट (TRF). एनआयएने 1,597 पानांचे आरोपपत्र दाखल केले. ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला.
आरोपपत्रानुसार, लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि द रेसिस्टन्स फ्रंटने पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता. लष्कर-ए-तैयबाचा शीर्ष कमांडर साजिद जट्ट हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले. 2022 मध्ये त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. साजिद जट्ट याला अनेक उपनावांनी ओळखले जाते.तो टीआरएफचा ऑपरेशनल प्रमुख आहे आणि काश्मीर खोऱ्यात भरती, निधी आणि घुसखोरीसारखी कामे तो करतो.
2024 मध्ये पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि जून 2024 मध्ये रियासी येथे बसवर झालेल्या हल्ल्याचाही कट त्याने रचला होता. पाकिस्तानी लष्कराने भारतात दहशतावाद्यांनी घुसण्यासाठी मदत केल्याचेही सांगितले जाते. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेले संबंध अधिकच तणावात आल्याचे बघायला मिळाले.