
NIA Pahalgam Investigation : पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुमारे दोन आठवड्यानंतर एनआयएला तपासात आता काही धागेदोरे सापडत आहेत. आतापर्यंत शेकडो संशयितांची चौकशी झाली होती. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केलेल्या तपासात एक स्थानिक दुकानदार तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. हा दुकानदार सह आणखी एक जण व्हिडीओत ‘अल्ला हु अकबर’ म्हणताना दिसला आहे. त्याचाही तपास सुरु आहे.
पहलगामवर २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी बैरसण खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या बेछुट गोळीबारात २६ जण ठार झाले होते. अतिरेकी हल्ल्यानंतर आता येथील स्थानिक दुकानदार रडारवर आले आहेत. या संशयिताने हल्ला होण्यापूर्वी १५ दिवसांपूर्वीच दुकान उघडले होते. परंतू ज्यादिवशी अतिरेकी हल्ला झाला त्या दिवशी मात्र त्याचे दुकान बंद होते. एनआयए आणि तपास यंत्रणांनी या दुकानदारांची चौकशी करीत आहेत.
एनआयएला तपासात आढळले की स्थानिक दुकानदाराने १५ दिवसांपूर्वी दुकान सुरु केले होते. परंतू घटनेच्या दिवशी मात्र तो व्यक्ती दुकान उघडायला आला नव्हता. याचमुळे एनआयएच्या तपासात या व्यक्तीविषयी संयश निर्माण झाला आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार एनआयएने त्याची इंटरनेट एक्टीव्हीटी तपासली. या व्यक्तीचा कुठल्या अतिरेक्याशी संपर्क तर नाही ना याचा तपास केला जात आहे. एनआयएने सर्व स्थानिक लोकांची यादी बनवून त्यांची चौकशी केली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत १०० लोकांची चौकशी केली. यात टुरिज्मशी संबंधीत लोक, फोटोग्राफर, एडव्हेन्चर स्पोर्ट्स संबंधित लोक आणि दुकानदारांची चौकशी, काही लोकांना अतिरेक्यांनी त्यांची नावे विचारुन सोडून दिले होते. या सर्व लोकांची इनपुट्स आधारे चौकशी करीत तपास पुढे नेला आहे. आतापर्यंत १०० लोकांची चौकशी झाली आहे. या पूर्वी NIA च्या एक जिपलाईन ऑपरेटरची देखील चौकशी केली होती.जो हल्ल्यावेळी ‘अल्ला हू अकबर’ अशी घोषणा करताना व्हिडीओत दिसत आहेत. चौकशीत त्याने आपण घाबरलेलो असल्याने अशा प्रकारे घोषणा केल्याचे म्हटले आहे.
परंतू हल्ल्यानंतर त्याने पोलीसांना फोन करण्याऐवजी त्याच्या मित्रांना फोन केला. हेच अतिरेकी २०२३ च्या कुलगामी हल्ला आणि पुंछमध्ये एअरफोर्सवर झालेल्या हल्ल्यातही सामील होते का याचा देखील एनआयए तपास करीत होते. सध्या एनआयएने या हल्ल्यामागे मोठी कट मानून तपास करीत आहे.