AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात धाकधुक वाढली, दोन महीन्यांचे राशन जमा करण्यात PoK मग्न

Pahalgam Attack: पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला आहे. या दरम्यान, शुक्रवारी पीओकेने एलओसी जवळ राहणाऱ्याना दोन महिन्यांचे राशन भरुन ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानात धाकधुक वाढली, दोन महीन्यांचे राशन जमा करण्यात PoK मग्न
| Updated on: May 04, 2025 | 4:57 PM
Share

Pakistan : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ल्यात काश्मिरमधील पहलगाम येथे २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशात प्रचंड तणाव आहे. रोजच बैठकांचा सिलसिला सुरु आहे. दोन्ही देशांचे नेते विविध वक्तव्यं करीत आहेत. या दरम्यान शुक्रवारी २ मे रोजी पाकव्याप्त काश्मिरात एलओसीजवळ राहणाऱ्या लोकांना आता राशन आणि खाण्यापिण्याच्या सामान भरुन ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.

एक अब्ज रुपयांचा आपातकालीन कोष

एलओसीच्या जवळील 13 मतदार संघात दोन महीन्यांसाठी अन्न धान्याची साठवणूक करण्याचे निर्देश स्थानिक विधानसभेत जारी केले आहेत. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी हे आवाहन केले आहे. हक यांनी सांगितले की स्थानिक सरकारने 13 मतदार संघ  क्षेत्रांत अन्न, औषधे आणि अन्य सर्व पायाभूत गरजेच्या वस्तू भरुन ठेवण्याचे आदेश दिले असून त्यासाठी एक अब्ज रुपयांचा आपात्कालीन कोष देखील तयार केले आहे.

मदरसेही बंद झाले

पाकव्याप्त काश्मिरातील सर्व मदरसे १० दिवसांसाठी बंद झाले आहेत. यापूर्वी, पीओकेला जाणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती आणि कराची आणि लाहोरचे हवाई क्षेत्र देखील पाकिस्तानने बंद केले होते. पीओके सरकारने येथील १३ सीमावर्ती विधानसभा मतदारसंघांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना किमान दोन महिन्यांचा रेशन आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे निर्देश जारी केले आहेत असे म्हटले जात आहे.

पीएम मोदी यांनी दिली मोकळीक

पहलगामवर हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीर येथील लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाम स्थित बैसरण घाटीत पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. प्रतिबंध अतिरेकी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

भारताची पाकिस्तान विरोधी कारवाई

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढला आहे. नवी दिल्लीने इस्लामबादच्या विरोधात कठोर स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत. यात 1960 च्या सिंधु पाणी वाटप करार निलंबित करणे, अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्टला बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हीसा सेवांना तातडीने रद्द करणे अशा प्रकारची पावले उचलली आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...