AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENGW vs SAW Semi Final Toss : दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय, इंग्लंडला किती धावांवर रोखणार?

England vs South Africa Women 2nd Semi Final Toss and Playing 11 : यजमान इंग्लंडने उपांत्य फेरीतील सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग करणार आहे. इंग्लंड दक्षिण आफ्रिकेसमोर किती धावांपर्यंत पोहचते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ENGW vs SAW Semi Final Toss : दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय, इंग्लंडला किती धावांवर रोखणार?
ENGW vs SAW TossImage Credit source: Icc and England Cricket X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 02, 2026 | 11:32 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. नॅट सायव्हर-ब्रंट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर लॉरा वॉल्डवॉर्ड्ट हीच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता इंग्लंड किती धावा करण्यात यशस्वी ठरणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही सातवी वेळ आहे. इंग्लंडने 6 पैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 2 सामने जिंकलेत. आता सातव्या सामन्यात कोण यशस्वी ठरणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

इंग्लंड ओव्हलमध्ये अजिंक्य

इंग्लंडचं ओव्हलमध्ये एकतर्फी वर्चस्व राहिलं आहे. इंग्लंडने या मैदानात खेळलेले पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंड या मैदानात सलग सहावा सामना जिंकत अंतिम फेरीत पोहचणार की दक्षिण आफ्रिका मैदान मारणार? यासाठी निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

इंग्लंडचा विजयी पंच, दक्षिण आफ्रिकेचा चौकार

दरम्यान इंग्लंडने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. इंग्लंडने साखळीतील पाचही सामने जिंकले. इंग्लंड साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी राहिली. तर दक्षिण आफ्रिकेने 5 पैकी 4 सामने जिंकले. त्यामुळे आता इंग्लंड सलग सहावा सामना जिंकून वर्ल्ड कप ट्रॉफीवर एक हात ठेवणार की दक्षिण आफ्रिका मैदान मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

इंग्लंड वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनी व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया केम्प, डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ आणि लॉरेन बेल.

दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वॉल्डवॉर्ड्ट (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेरी डर्कसेन, स्युने लुस, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको म्लाबा.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात