AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट

WhatsApp Username Reservation : व्हॉट्सॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी युजरनेम रिझर्वेशन फीचर सुरू केले आहे. मात्र, हे फीचर आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट
whatsapp username featureImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 01, 2026 | 5:51 PM
Share

जगातील अनेक लोक व्हॉट्सॲप वापरतात. व्हॉट्सॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी युजरनेम रिझर्वेशन फीचर सुरू केले आहे. या फीचरमुळे मोबाईल नंबर शेअर न करता फक्त युजरनेमच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधता येणार असून चॅटिंग करता येणार आहे. मात्र, हे फीचर आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आता केंद्र सरकार त्याची चौकशी करू करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्हॉट्सॲपच्या या फीचरमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करत आहे. या नव्या युजर आयडी फीचरचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त होत असल्याने त्यावर वादही सुरू झाला आहे. त्यामुळे सरकार या फीचरच्या प्रत्येक पैलूची तपासणी करणार आहे.

मेटाला नोटीस मिळू शकते

सरकारला तपासादरम्यान काही त्रुटी किंवा नियमभंग आढळल्यास मेटा कंपनीला नोटीसही पाठवली जाऊ शकते. या प्रकरणात भारतातील विद्यमान कायदे आणि नियमांच्या आधारे सरकार पुढील निर्णय घेणार आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या फीचरचे बारकाईने मूल्यमापन केले जाणार आहे.

सरकारला कोणती चिंता?

व्हॉट्सॲपच्या या फीचरमुळे मोबाईल नंबर न देता कोणाशीही चॅट सुरू करता येणार आहे. यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता वाढेल, असा दावा कंपनीने केला असला तरी त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी युनिक युजरनेम तयार करू शकणार असून तो आवश्यकतेनुसार अनेक वेळा बदलूही शकणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने युजरनेम बदलल्यास त्याचा शोध घेणे कठीण होऊ शकते, अशी सरकारची चिंता आहे.

हे फीचर कसे काम करणार?

व्हॉट्सॲपवर अकाउंट खाते तयार करण्यासाठी आणि व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल नंबर पूर्वीप्रमाणेच अनिवार्य राहणार आहे. मात्र, इतर वापरकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि चॅट करण्यासाठी युजरनेमचा वापर केला जाईल. व्हॉट्सॲपसाठी हे फीचर नवीन असले तरी टेलिग्रामवर अशा प्रकारची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. आता सरकारने यावर आक्षेप न घेतल्यास हे फीचर व्हॉट्सॲपवर पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु