AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUSW vs WIW : ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत टॉस जिंकला, विंडीज विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

Australia Women vs West Indies Women 1st Semi Final Toss and Playing 11 : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी सज्ज झाले आहेत. कांगारुंनी विंडीज विरुद्ध चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

AUSW vs WIW : ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत टॉस जिंकला, विंडीज विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
AUSW vs WIW TossImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 30, 2026 | 7:40 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20i World Cup 2026) साखळी फेरीचा थरार आटोपलाय. एकूण 12 पैकी उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज 30 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. ऑस्ट्रेलियाची कॅप्टन सोफी मॉलिनिक्स हीने फिल्डिंगचा निर्णय घेत विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता विंडीज 20 ओव्हरमध्ये किती धावा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विंडीजवर वरचढ, पाहा आकडे

ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीम वेस्टइंडिजवर टी 20i क्रिकेटमध्ये वरचढ राहिली आहे. उभयसंघातील हा 20वा सामना आहे. याआधी उभयसंघात 19 सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने 19 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तर विंडीजला केवळ 2 सामनेच जिंकता आले आहेत.

तसेच ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 6 सामने खेळवण्यात आले आहेत. इथेही ऑस्ट्रेलिया विंडीजवर वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. ऑस्ट्रेलियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत या 6 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर विंडीजला ऑस्ट्रेलिया विरुद्ध केवळ 1 सामना जिंकण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

ऑस्ट्रेलिया-विंडीज सेमी फायनलसाठी सज्ज

वेस्ट इंडीज वुमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन : कियाना जोसेफ, हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), स्टेफनी टेलर, डीएंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, जाझारा क्लॅक्सटन, जॅनिलिया ग्लासगो, आलिया ॲलेन, ॲफी फ्लेचर आणि करिश्मा रामहरक.

ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : जॉर्जिया व्होल, बेथ मुनी (विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, एश्ले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला कॅरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गार्थ आणि लुसी हॅमिल्टन.

Follow Us
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार