AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे विभागात बंपर भरती, हजारो पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु, थेट मिळवा सरकारी नोकरी आणि..

RRB JE Vcancy 2026 : रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. थेट एका झटक्यात केंद्राची नोकरी मिळू शकते. रेल्वे विभागाने बंपर भरती प्रक्रिया राबवली आहे. 4 हजारांपेक्षा अधिक जागांकरिता रेल्वेकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

रेल्वे विभागात बंपर भरती, हजारो पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु, थेट मिळवा सरकारी नोकरी आणि..
RRB Vcancy
| Updated on: Jul 03, 2026 | 8:51 AM
Share

RRB JE Vcancy 2026 : केंद्र शासनाची नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यामध्येही रेल्वे विभागात नोकरी लागणे म्हणजे सोन्याहून अधिक पिवळेच की.. केंद्र सरकारची नोकरी शोधणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाने विविध जागांकरिता बंपर भरती प्रक्रियेला सुरूवात केली. विशेष म्हणजे आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ज्यूनिअर इंजिनिअर, डिपो मॅटेरिअल सुपरिंटेंडेंट आणि केमिकल मेटलर्जिकल असिस्टेंट या पदांकरिता भरती प्रक्रिया रेल्वे बोर्डाकडून राबवली जात आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ज्युनिअर इंजिनिअर, डीएमएस आणि सीएमए याच्या एकूण 4098 जागांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

ज्या लोकांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायची आहेत, अशांनी www.rrbapply.gov.in या ठिकाणी जाऊन अर्ज करावीत. याच वेबसाईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहितीही मिळेल. ही एक मोठी सुवर्णसंधीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांकरिता होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आली. बीटेक ते डिप्लोमाधारकही या भरती प्रक्रियेक‍रिता आरामात अर्ज करू शकतात.

हे सर्व पद लेवल 6 अंतर्गत भरली जातील. या भरतीची अधिसूचना रेल्वे भरती बोर्ड अर्थात आरआरबीने जारी केली. सर्वपदांकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावीत. भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती आपल्याला www.rrbapply.gov.in या साईटवर मिळेल. मग अजिबात उशीर न करता इच्छुकांनी पटापट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले की, त्यांनी रिक्तपदे आरआरबीला पाठवली आहेत. त्याच्या आधारावर भरती प्रक्रिया पार पडेल. आरआरबी त्यानुसार, शैक्षणिक योग्यता, वयाची अट, परीक्षा नक्की कशी घ्यायची याबाबत ठरवेल. आपण अर्ज नक्की कोणत्या पदाकरिता करत आहोत, हे उमदेवाराने तपासूनच अर्ज करावीत. थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मग लवकरात लवकर अर्ज करा.

Follow Us
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा