मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मात्र जरांगे यांनी आंदोलनावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले जरांगे वाचा...

मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात आज राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊ त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आंदोलन थांबणार नाही अशा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांना रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. आज राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन सरकार या प्रकरणात सकारात्मक असून तुम्ही आंदोलन करु नका अशी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला असून या प्रकरणात सर्व तक्रारदार तरुणांनी २८ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत येऊन सरकारपुढे आपल्या गाऱ्हाणी मांडुया असे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणात आता येत्या २८ ऑगस्ट रोजी नेमके काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
२८ ऑगस्टला तुम्ही आंतरवालीत या येथे तुमची गाऱ्हाणी आम्ही राज्य सरकारच्या प्रतिनिधी समोर मांडू असे आवाहन मराठा बांधवाना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे. तुम्हाला जर नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही. किंवा इतर काही अडचणी असतील तर तुम्ही येत्या २८ तारखेला आंतरवालीत या त्यावर सरकार काय निर्णय घेतेय हे आपण पाहणार आहोत, पण आंदोलन काही मागे घेणार नाही असाच इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तुमचे प्रश्न घेऊन येत्या २८ तारखेला या
उपसमितीचे मंत्री आणि सरकारी अधिकारी येथे येणार आहेत. त्यांच्या समोर सोक्षमोक्ष होऊ दे की प्रमाणपत्र रद्द करण्यामागे नक्की कोण आहे. जर सरकार म्हणत आहे की आम्ही अधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले आहेत. मग अधिकारी कसे काय प्रमाणपत्र रद्द करु लागले ? जर सरकारच यामागे आहे का ? तर तेही येथे स्पष्ट होईल त्यामुळे सरकाच्या प्रतिनिधीसमोर तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन येत्या २८ तारखेला यावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केली आहे.
