AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युझरनेम फीचरबाबत सरकारची कठोर भूमिका कायम; व्हॉट्सॲपनंतर आणखी दोन ॲपला नोटीस

युझरनेम फीचरबाबत सरकारची कठोर भूमिका कायम आहे. व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आता आणखी दोन प्लॅटफॉर्मला नोटी, बजावली आहे.

युझरनेम फीचरबाबत सरकारची कठोर भूमिका कायम; व्हॉट्सॲपनंतर आणखी दोन ॲपला नोटीस
signal and telegram
| Updated on: Jul 03, 2026 | 9:53 AM
Share

युझरनेम फीचरबाबत सरकारची कठोर भूमिका कायम आहे. व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आता टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस बजावली आहे. त्यांच्या सध्याच्या युझरनेम फीचरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे प्लॅटफॉर्म्स फसवणूक आणि बनावट ओळख वापरण्याशी संबंधित समस्या कशा हाताळत आहेत, असे विचारण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामला पाठवलेल्या नोटीसमध्ये सरकारने विचारले आहे की, त्यांना युझरनेम फीचर कायम ठेवण्याची परवानगी का दिली जावी. बुधवारी, केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या युझरनेम फीचरबाबत मेटाला नोटीस बजावली. या फीचरमुळे ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ‘डिजिटल अटक’ घोटाळे आणि बनावट ओळख वापरून होणारे हल्ले लक्षणीयरीत्या वाढू शकतात, अशी चिंता व्यक्त केली. यामुळे दुर्भावनापूर्ण घटकांना सहजपणे संपर्क साधणे आणि संदेश पाठवणे शक्य होत होते.

सरकारने काय म्हटले? सरकारने मेटाला असेही विचारले की, या फीचरमुळे सायबर गुन्हे वाढू शकतात, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा आणि नियमांनुसार या फीचरवर कारवाई का सुरू करू नये. केंद्र सरकारने हे देखील आठवण करून दिली की, एक महत्त्वाचा सोशल मीडिया मध्यस्थ म्हणून व्हॉट्सॲप माहिती तंत्रज्ञान कायदा आणि नियमांनुसार योग्य ती खबरदारी घेण्याच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यास बांधील आहे. बुधवारी एका निवेदनात, व्हॉट्सॲपने या फीचरचा बचाव केला आणि म्हटले की, घोटाळे आणि बनावट ओळख रोखण्यासाठी तसेच वापरकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे आधीपासूनच सुरक्षा उपाययोजना आहेत.

50 कोटींहून अधिक वापरकर्ते भारत ही व्हॉट्सॲपची सर्वात मोठी बाजारपेठ असून, येथे 50 कोंटीहून अधिक वापरकर्ते आहेत. टेलिग्रामच्या तुलनेत याचा वापरकर्ता वर्ग खूप मोठा आहे, फसवणूक, बनावट ओळखमुळे गेल्या महिन्याभरात भारतात टेलिग्राम नियामक देखरेखीखाली होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेसंबंधित माहितीफुटी आणि बनावट नीट परीक्षेचे पेपर्स, दिशाभूल करणारी सामग्री आणि इंतर फसवणुकीच्या पद्धती रोखण्यात प्लॅटफॉर्म अयशस्वी ठरल्याचा आरोपानंतर, भारत सरकारने टेलिग्राम आणि त्याच्याशी संबंधित वेब सेवांवर 22 जूनपर्यंत बंदी घातली होती, मात्र, एका आठवड्याची सरकारी बंदी संपल्यानंतर हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म भारतात पुन्हा सेवेत परतले आहे.

Follow Us
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ