AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

365 दिवसांची चिंता मिटली, 13 रुपयांमध्ये अनलिमिटेड डेटा; या कंपनीचा धमाकेदार प्लॅन

Vi 365 Days Plan : VI कंपनीकडे आधीपासून अनेक वार्षिक प्लॅन्स उपलब्ध मात्र आता नवा 4600 रुयपे किमतीचा हा नवीन प्लॅन इतरांपेक्षा खास ठरत आहे. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जाणून घेऊयात.

365 दिवसांची चिंता मिटली, 13 रुपयांमध्ये अनलिमिटेड डेटा; या कंपनीचा धमाकेदार प्लॅन
VI 365 Recharge InfoImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 01, 2026 | 3:15 PM
Share

भारतात जवळपास सगळेच लोक इंटरनेट असलेला स्मार्टफोन वापरतात. अशातच आता व्होडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन वार्षिक रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. कंपनीकडे आधीपासून अनेक वार्षिक प्लॅन्स उपलब्ध मात्र आता नवा 4600 रुयपे किमतीचा हा नवीन प्लॅन इतरांपेक्षा खास ठरत आहे. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळतो. हा प्लॅन Vi च्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर रिचार्जसाठी उपलब्ध आहे. या प्लॅनची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

4600 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार?

VI च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता, दररोज 100 SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा मिळतो. मात्र, कंपनीने हा डेटा अनलिमिटेड असल्याचे सांगितले असले तरी त्यावर फेअर यूसेज पॉलिसी (FUP) लागू आहे. कंपनीने या प्लॅनमध्ये प्रत्येक 28 दिवसांसाठी 300GB डेटाची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजे महिन्याला 300 GB डेटा मिळेल. तसेच, ग्राहकांना 5G डेटा देखील मिळतो. मात्र, 5G सेवेलाही हाच 300GB प्रति 28 दिवसांचा FUP लागू असल्याने 4G आणि 5G दोन्हीमध्ये डेटाची मर्यादा समान राहणार आहे.

दररोजचा खर्च किती?

4600 रुपयांच्या या प्लॅनची 365 दिवसांची वैधता असल्यामुळे याचा सरासरी दररोजचा खर्च सुमारे 12.60 रुपये इतका पडतो. किंमत तुलनेने जास्त असली तरी प्रत्येक 28 दिवसांत 300GB डेटा मिळत असल्याने जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. मात्र, या प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त OTT किंवा इतर लाभ दिलेले नाहीत.

Jio च्या 365 दिवसांच्या प्लॅनशी तुलना

रिलायन्स जिओच्या 365 दिवसांच्या सर्वात महागड्या प्लॅनची किंमत 3,999 आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. म्हणजेच प्रत्येक 28 दिवसांत एकूण 70GB डेटा मिळतो. याशिवाय, जिओच्या या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचे जिओ हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन, 50GB मोफत क्लाऊड स्टोरेज, तसेच 35,100 किमतीच्या गुगल जेमिनी प्रोचे सदस्यत्व, 5TB क्लाऊड स्टोरेज आणि Nano Banana यांसारखे अतिरिक्त फायदेही दिले जातात.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच